शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शाळांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष; मोहीम थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:05 IST

अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने  जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवात धडाक्याने  झाल्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे बाश्रीटाकळी तालुक्यात चित्र आहे. शिक्षकही  अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देअध्यापनात तंत्रज्ञानाचा वापरही झाला दुर्मीळ

बबन इंगळेलोकमत न्यूज नेटवर्कसायखेड  : अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने  जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवात धडाक्याने  झाल्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे बाश्रीटाकळी तालुक्यात चित्र आहे. शिक्षकही  अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि सीईओ एम. देवेंद्रसिंग यांच्या  कार्यकाळात जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली. लोकसहभागा तून सुरू झालेल्या मोहिमेंतर्गत सुरुवातीलाच ५५ शाळा डिजिटल करण्यात आल्या.  त्यानंतर दुसर्‍या सत्रात ही मोहीम थंडावली आहे. तालुक्यात एकूण १३६ शाळा  आहेत. त्यापैकी ८१ शाळा अजूनही डिजिटल झाल्या नसल्याचे चित्र आहे. मे  २0१७ पासून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली व त्यानंतर विविध  वेबसाइटवर शिक्षकांना माहिती भरावी लागत आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळा  डिजिटल करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. ज्या शाळा डिजिटल झाल्या, त्या पैकी अनेक शाळांमधील साहित्य धूळ खात पडलेले आहे. ग्रामीण भागातील अनेक  शाळांमध्ये वीज नाही, असली तरी भारनियमनामुळे डिजिटलचे साहित्य उपयोगा तच आणता येत नसल्याचे चित्र आहे. खासगी शाळांमधील अतिरिक्त  शिक्षकांचे  समायोजन आणि जिल्हा परिषदेतील शाळांतील शिक्षकांच्या बदल्या यामुळे  डिजिटल शाळा मोहीम बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे. इंग्रजी माध्यमाचे महागडे शिक्षण शुल्क भरून प्रवेश मिळणार्‍या शाळेप्रमाणे जि.  प.च्या प्राथमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शाळा सुरू करण्याची चळवळ उभी  केली; परंतु सध्या ही चळवळ बंद पडल्याने ग्रामीण भागातील बहुतांश जि. प.च्या  शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता घसरत चालल्याचे दिसून येत आहे. ही चळवळ नव्या  उमेदीने गतिमान करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी, याकरिता  जनजागृती, लोकसहभागाकरिता प्रवृत्त करणे, याचे महत्त्व प्रसाराद्वारे व्हावे, तरच  या उपक्रमास गती येईल.

अध्यापन विस्कळीत शासनाचे विविध आदेश येत असल्याने तालुक्यातील अनेक शाळांमधील अध्यापन  विस्कळीत झाले आहे. शिक्षकांचा बहुतांश वेळ शासनाने सुरू केलेल्या विविध  वेबसाइटवर भरण्यातच जात असल्याने त्यांना शिकवण्यासाठी वेळच मिळत  नसल्याचे चित्र आहे. त्यातही समायोजन आणि बदली प्रक्रियेमुळे अनेक शाळांमध्ये  अध्यापन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. 

जि.प.च्या प्राथमिक शाळा डिजिटल व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभाग व  प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत. शाळा स्तरावरील गावातील  लोकसहभागाअभावी या उपक्रमाला प्रतिसाद मिळत नसल्याची कारणे समोर आली  आहेत. तरीही ग्रामपातळीवर याबाबत शिक्षण विभागाच्या माध्यमातून जनगृतीची  मोहीम राबविण्याचा प्रयत्न करू. - मीनल भेंडे, गटशिक्षणाधिकारी, पं.स. बाश्रीटाकळी.