शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचार्‍यांच्या समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:37 IST

अकोला: मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत सफाई कर्मचार्‍यांच्या समस्यांकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. चार महिन्यांचे वेतन तसेच पेन्शन थकीत असल्यामुळे कर्मचार्‍यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्कील झाले आहे.

ठळक मुद्देसंघटनेच्या पदाधिकार्‍यांचा आरोपआज मनपासमोर ‘भीक मांगो’ आंदोलन९ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत सफाई कर्मचार्‍यांच्या समस्यांकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. चार महिन्यांचे वेतन तसेच पेन्शन थकीत असल्यामुळे कर्मचार्‍यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्कील झाले आहे. प्रशासनाने समस्या निकाली न काढता सफाई कर्मचार्‍यांवर कारवाईचे सत्र सुरू केल्याचा आरोप करीत थकीत वेतनाच्या मुद्यावर उद्या बुधवारी मनपासमोर ‘भीक मांगो’ आंदोलन छेडणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने पी.बी. भातकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.  मनपातील सेवारत तसेच सेवानवृत्त सफाई कर्मचार्‍यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन आणि सेवानवृत्ती वेतन थकीत आहे. पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे सफाई कर्मचार्‍यांमध्ये रोष पसरला आहे. दोन आठवड्यानंतर गोगानवमीचा सण असून, त्यानिमित्त अग्रिम रक्कम, महागाई भत्ता देताना प्रशासनाने आखडता हात घेतल्याचा आरोप यावेळी संघटनेचे पदाधिकारी पी.बी. भातकुले यांनी केला. कंत्राटी पद्धतीनुसार सफाई कर्मचार्‍यांची भरती रद्द करून आस्थापनेवर नवीन सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, साफसफाईसाठी विविध साहित्याचा अभाव असून, त्याचा पुरवठा करावा, शासनाच्या धोरणानुसार सफाई कर्मचार्‍यांच्या मंजूर पदावर १५ टक्के अतिरिक्त सफाई कामगारांची नियुक्ती करावी, रजा रोखीकरण, अंशराशीकरणाचा निपटारा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मनपा कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा न करण्याचे निर्देश आयुक्त अजय लहाने यांनी दिले होते. वित्त व लेखा विभागाने आयुक्तांचे निर्देश धाब्यावर बसवित जुलै महिन्यापर्यंत सुमारे ७६ पेक्षा अधिक कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाची रक्कम दिल्याचा आरोप यावेळी शांताराम निंधाने यांनी केला. यामध्ये एकही सफाई कर्मचारी नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. सफाई कर्मचार्‍यांचे खच्चीकरण केल्या जात असून, वेतनाच्या मुद्यावर उद्या बुधवारी शहरात भीक मांगो आंदोलन छेडणार असल्याची माहिती पी.बी. भातकुले यांनी दिली. यावेळी विजय सारवान, हरिभाऊ खोडे, धनराज सत्याल, प्रताप सारवान, रमेश गोडाले, मदन धनजे, सोनू पचेरवाल, नारायण मकोरिया, शिवा बोयत, सचिन चावरे, मनोज निंधाने उपस्थित होते. 

९ ऑगस्टपासून कामबंद आंदोलनप्रशासनाने सफाई कर्मचार्‍यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले.

करवाढीचे सर्मथन!मनपाचे उत्पन्न वाढविण्यासोबतच कर्मचार्‍यांच्या वेतनाचा तिढा कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रशासनाने करवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सफाई कर्मचारी संघटना सर्मथन करीत असल्याचे पी.बी. भातकुले यांनी सांगितले.