शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

औषधं हवी? पानटपरी, किराणा दुकानावर चला!

By admin | Updated: September 25, 2014 03:01 IST

अकोला ग्रामीण भागातील वास्तव उघडकीस, सर्वसामान्यांचा जीव धोक्यात.

सचिन राऊत / अकोलाजिल्हय़ात कुठेही आणि केव्हाही ज्या प्रमाणे खरमुरे-फुटाण्यांची विक्री होते त्याचप्रमाणे किराणा दुकान व पानटपर्‍यांमधून जीवघेण्या औषधांची सर्रास आणि खुलेआम विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातील किराणा दुकान व राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यानजीक असलेल्या काही पानटपर्‍यांमध्ये या घातक औषधांची विक्री सुरू असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले. या दुकानदारांना औषधांचा पुरवठा करणार्‍या होलसेलर्स औषध विक्रेत्यांनाही प्रशासनमधील अधिकार्‍यांचेच पाठबळ असल्याची माहिती आहे.औषध खरेदी किंवा विक्री चुकीची झाल्यास त्याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत असून, त्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संवेदनशील विषय असल्याने औषध विक्री आणि खरेदी करण्यासाठी शासनाने नियमावली ठरवून दिली. तसा कायदाही करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे देण्यात आली आहे. औषध विक्री करण्यासाठी ड्रग अँण्ड कॉस्मेटिीस अँक्ट १९४0 च्या कलम ६५(२)नुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक आहे. यासोबतच रजिस्टर्ड फार्मासिस्टची उपस्थिती व डॉक्टरच्या चिठ्ठीवरच औषध विक्री करण्याचा कायदा करण्यात आला आहे. मात्र या कायद्याला जिल्हय़ातील किराणा दुकानदार व पानटपर्‍यांवर पायदळी तुडविण्यात येत आहे. किराणा दुकानदार व पानटपर्‍यांवर खुलेआम औषधांची विक्री करण्यात येत असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. मात्र किराणा दुकानदार व पानटपर्‍यांवर मिळणारे औषध विनादेयकानेच खरेदी व विक्री करण्यात येत असून याकडे, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हय़ात कुठेही पानटपरी व किराणा दुकानातून औषधांची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. असा प्रकार होत असल्यास तो गंभीर असून, सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. औषधांची पानटपरी व किराणा दुकानातून विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल. होलसेलर्स औषध विक्रेत्यांवरही यापुढे नजर ठेवण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे प्रभारी सह आयुक्त एच वाय मेतकर यांनी सांगीतले.