शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: December 29, 2014 01:46 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात बच्चू कडू यांचे प्रतिपादन.

अकोला : निसर्गाच्या कोपामुळे आणि मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे जगाच्या पोशिंद्यावर आज उपाशीच राहण्याची पाळी आली आहे. घर, दार, शेती विकूनदेखील कष्टात जीवन जगणारे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. समाज आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून या अन्नदात्याला वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात रविवारी दुपारी पार पडलेल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. आमदार कडू पुढे म्हणाले की, समाजजागृतीकरिता कीर्तन, भजन, मेळावे, महोत्सव तर व्हायलाच हवेत, मात्र स्वत:चा देह झिजवून तुम्हा-आम्हा सर्वांचे पोट भरण्यासाठी हाडाची काडं करणार्‍या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. परिस्थितीने हतबल झालेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहेत. त्यांचे मतपरिवर्तन करण्याची खरी गरज असल्याने, ग्रामगीतेच्या माध्यमातून ती प्रत्येक गावात पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी गुरुदेवभक्तांना केले. केवळ शासकीय योजना व यंत्रणेवर अवलंबून न राहता सामूहिक प्रयत्नांची जोड देण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. युवा महोत्सवात कपिल ढोक यांनी राष्ट्रसंतांना अपेक्षित भारताची संकल्पना विषद केली आणि बुवाबाजी करून संत म्हणवू घेणार्‍यांवर परखड ताशेरे ओढले. बुलडाण्याचे दीपक महाराज साबळे यांनी राष्ट्रसंतांचे विचार घरोघरी पोहचविण्यासठी असे कार्यक्रम गावागावांत घेतल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.