शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परसबाग तयार करण्याच्या उपक्रमाला चालना देण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

अकोला : ‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या परसबागेत पिकविलेला सेंद्रीय व आहारमूल्य ...

अकोला : ‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या परसबागेत पिकविलेला सेंद्रीय व आहारमूल्य असलेला भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार असून, परसबाग तयार करण्याच्या उपक्रमाला अधिकाधिक चालना देण्याची गरज आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी सोमवारी व्यक्त केले.

‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे निर्मित जिल्हास्तरीय पोषण परसबागेला भेट दिली असता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापक गजानन महल्ले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुरज गोहाड, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ ‍कीर्ती देशमुख उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात १५ जून ते १५ जुलै २०२१ या कालावधीत ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कटियार यांनी परसबागेचे महत्त्व समजावून सांगितले.

कोरोनाकाळातही जिल्ह्यात

४१०० परसबागांची निर्मिती !

जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही ग्रामीण महिलांनी ४१०० परस बागांची निर्मिती केली आहे. उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यात २०१८ पासून आतापर्यंत आहार पोषण व स्वच्छताविषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता, स्तनदा माता, ६ ते २४ महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित स्वच्छ व जैविक पद्धतीने पिकवलेला ताजा भाजीपाला व फळे इत्यादींचा समावेश व्हावा याकरिता उमेद अभियान प्रयत्न करत आहे.

......................फोटो.............