शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पैसेवारीची पद्धत बदलण्याची गरज

By admin | Updated: August 11, 2015 22:52 IST

ब्रिटिशकालीन पद्धतीचाच अवलंब ; शेतक-यांवर होतोय अन्याय.

अकोला : शेतजमिनीपासून मिळणार्‍या महसुली उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी आजही ब्रिटिशकालीन पैसेवारीची पद्धतच अवलंबली जात आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाद्वारा वेळोवेळी तज्ज्ञांच्या समिती गठित करण्यात आल्यात; परंतु दोन समितींच्या शिफारशी व काही सूचना वगळता यामध्ये फारसा बदल झालेला नाही. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पैसेवारी काढण्याच्या ब्रिटिशकालीन पद्धतीवर आक्षेप घेत आवश्यक ते बदल करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. अकोला जिल्हा दौर्‍यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पैसेवारीच्या पद्धतीत बदल करण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले होते. राज्यातील जमिनीची विविध प्रतवारी आहे. अलीकडच्या काळात निसर्गदेखील साथ देत नाही. पाऊस लहरी झालेला आहे. याचा विपरीत परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होत आहे. सतत तीन वर्षांपासून नापिकी असताना गत हंगामातच जिल्ह्यातील पैसेवारी ५0 पैशांच्या आत नोंदविली गेली. नापिकी आणि सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विदर्भ व मराठवाड्यात पैसेवारी कमी आल्याने शासनाला दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून उपाययोजना कराव्या लागल्या होता. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील नियमानुसार शासन दरवर्षी खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढते. पिकांची पैसेवारी ५0 पैसे व अवर्षणप्रवण क्षेत्रात ६0 पैशापेक्षा कमी असेल तेथे दुष्काळ जाहीर केला जातो. सध्या अस्तित्वात असणार्‍या पैसेवारी काढण्याच्या पद्धतीमध्ये १९८९ मध्ये भाई भगवंतराव गायकवाड यांच्या समितीने केलेल्या अनेक शिफारशींचा समावेश आहे. यानंतर आघाडी सरकारचे महसूल मंत्री नारायण राणे समितीने केलेल्या दोन शिफारशींचा समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर गठित होणार्‍या तज्ज्ञांच्या समितीमध्ये निसर्ग बदल विषयाच्या अभ्यासकांचाही समावेश झाल्यास परिस्थितीनुसार वास्तव पैसेवारी जाहीर करण्यास मदत होईल.

*जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या

         जिल्हय़ातील हवामानात बदल, पाऊस याचा पिकांवर होणारा परिणाम यासाठी जिल्हा हवामान निरीक्षण गट ही जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. दुसरी समिती ही पीक पैसेवारी जिल्हा देखरेख समिती असून, त्याचे अध्यक्षसुद्धा जिल्हाधिकारी असतात. यामध्ये कृषी, सहकार विभाग व बँकेचे अधिकारी असतात.

*नजरअंदाज पैसेवारी

       शेतीपिकांची स्थिती काय आहे, याचे अनुमान घेण्यासाठी महसूल विभागाद्वारा नजरेच्या अंदाजाने हंगामी पैसेवारी काढण्यात येते. यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीत बदल झाल्यास सुधारित हंगामी नजरअंदाज पैसेवारी काढणे महसूल विभागाला बंधनकारक आहे.

*पैसेवारी घोषित करण्याच्या तारखा

हंगामी पैसेवारी - ३0 सप्टेंबर

सुधारित हंगामी पैसेवारी - १५ नोव्हेंबर

अंतिम पैसेवारी - १५ जानेवारी

रब्बी हंगामी पैसेवारी - १५ जानेवारी

सुधारित हंगामी पैसेवारी - १५ फेब्रुवारी

अंतिम पैसेवारी - १५ मार्च