शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

बुडित बँक-पतसंस्थांमधील रक्कम परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे संघटन गरजेचे - विश्वास उटगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 20:39 IST

बुडित बँका आणि पतसंस्थेतून जर हक्काचा पैसा काढायचा असेल तर ठेविदारांना संघटन करून न्यायालयात दाद मागावी लागेल.

- संजय खांडेकरअकोला : भविष्याची शिदोरी म्हणून पोटाला चिमटा देत आयुष्याची संपूर्ण कमाई अनेकजण बँक -पतसंस्थेत ठेवी म्हणून ठेवतात. पण बेजबाबदार संचालक आणि बँक अधिकारी लायकी नसलेल्यांना कर्ज देऊन बँका बुडवितात. असल्या वाढत्या प्रकारामुळे सामान्य माणसांचा बँकांवरील विश्वास धूसर होत चालला आहे. बुडित बँका आणि पतसंस्थेतून जर हक्काचा पैसा काढायचा असेल तर ठेविदारांना संघटन करून न्यायालयात दाद मागावी लागेल. त्यासाठी काय करावे याची माहिती बँक आणि कामगार संघटनेचे नेते विश्वास उटगी यांनी दिली. गुरूवारी ते अकोल्यात येऊन गेले, यादरम्यान त्यांच्या लोकमतने साधलेला संवाद.प्रश्न : डबघाईस आलेल्या बँका आणि पतसंस्थामध्ये अडकलेली रक्कम कशी निघेल?उत्तर : बुडीत बँका-पतसंस्थांमधील रक्कम काढण्यासाठी ठेविदारांमध्ये जागृती आणण्यासाठीच मी विदर्भात आलो.अकोला आणि शेगाव येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप सोसायटी ठेविदारांनी मला येथे पाचारण केले आहे. ठेवीदारांना संघटित केल्याशिवाय ठेवीदारांच्या रकमेला शंभर टक्के सुरक्षा मिळणार नाही असे रिझर्व बँक आॅफ इंडिया आणि भारत सरकारचे धोरण आहे. रिजर्व बँकेच्या धोरणानुसार एमपीआयडी न्यायालयात दाद मागण्यासाठी ठेवीदारांचे संघटन उभारणे गरजेचे आहे.प्रश्न : ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप सोसायटीच्या ठेविदारांना आपण काय सल्ला दिला?उत्तर : अकोला-शेगाव येथील ठेविदारांची बैठक मी घेतली. २ वर्षांपूर्वी डबघाईस आलेल्या ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप सोसायटीच्या ठेविदारांचे कोट्यवधी रूपये पडून आहे. संचालकमंडळांविरूध्द कारवाई सुरू असली तरी ठेविदारांची हक्काची रक्कम गोठली गेली आहे. प्रशासक नियुक्त असलेल्या या सोसायटीच्या कर्जदारांकडून ४५ कोटींची वसुली सुरू आहे. ही मोहिम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. ठेविदारांनी एकसंघ होऊन न्यायीक लढा उभारावा, अन्यथा रक्कम मिळणे नाही. असा सल्ला येथील ठेविदारांना देण्यात आला.प्रश्न : शिखर बँकेच्या संचालकांवरील ईडीची कारवाई ऐन निवडणुकीच्या वेळी योग्य आहे का ?उत्तर : शिखर बँकेवरील ईडीची आताचं झालेली कारवाई म्हणजे घाणेरडे राजकारण होय. ज्यांचा संचालक म्हणून उल्लेखही नाही त्यांना देखिल गोवण्याचा प्रयत्न होत आहे. याचे उत्तर नागरिकांना केवळ बॅलेट पेपरच्या माध्यमातून माध्यमातूनच दिले जाऊ शकते.प्रश्न : पीएमसीवर झालेल्या कारवाईबाबत आपणास काय वाटते?उत्तर : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक ही राज्यात नव्हे तर देशात नामवंत आहे. एचडीआयएल पितापुत्रांना दिलेल्या २५०० कोटींंच्या कर्जामुळे या बँकेवर ही वेळ आली. संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे बँकेवर प्रशासकाची नेमणूक झाली. १९ पूर्वीच्या आॅडिटमध्येच ही बाब स्पष्ट व्हायला हवी होती. यामुळे जनतेची कोंडी झाली आहे.प्रश्न : बॅक विलिनीकरणामुळे काय साध्य होणार आहे?उत्तर : केंद्र सरकारने सध्या बँक विलिनिकरणावर विशेष जोर दिलेला आहे. देशातील बँक विलीन झाल्या तर मोठे कर्ज बुडवे आहेत त्यांना लाभ होणार आहे. सरकारचा हा छुपा अजेंडा अजूनही अनेकांना समजलेला नाही. बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी बँक विलिनीकरणाला विरोध करण्यासाठी आंदोलन उभारण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbankबँकinterviewमुलाखत