शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या व्यसनाविरुद्ध जनजागृती आवश्यक - चव्हाण

By admin | Updated: June 1, 2015 02:30 IST

तंबाखू मुक्ती दिन रॅलीत १५0 एन.सी.सी. कॅडेट्सचा सहभाग.

अकोला : केवळ विरंगुळा म्हणून लहान मुलांमध्ये तंबाखू व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परिणामी या जीवघेण्या व्यसनामुळे उद्याच्या पिढीचे आरोग्य धोक्यात आहे. या जीवघेण्या व्यसनाविरोधी सर्वच स्तरावर जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कर्नल अजित चव्हाण यांनी केले. ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन अकोलाच्या वतीने रविवार, ३१ मे रोजी ह्यतंबाखूविरोधी दिवसाह्णनिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. ही रॅली सकाळी ९ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन कार्यालयातून निघाली. येथून ही रॅली खदान पोलीस स्टेशन व नंतर सिंधी कॅम्पस्थित गुरुनानक विद्यालय येथे पोहोचली. येथे पोहोचल्यावर एन.सी.सी. कॅडेटला संबोधित करताना ते बोलत होते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मुत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. लोकांना अशा पदार्थांच्या सेवनापासून परावृत्त करून त्यांच्यात जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी कर्नल अजित चव्हाण यांनी केले. एन.सी.सी. कार्यालय ते रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन मार्गे रॅली काढण्यात आली. परंतु, काही कारणास्तव या रॅलीचा मार्ग बदलण्यात आला. तंबाखूविरोधी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील १५0 एन.सी.सी. कॅडेट सहभागी झाले होते. *एन.सी.सी. कॅडेट करणार जनजागृतीतंबाखूविरोधी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान कर्नल अजित चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे शाळा, महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट सर्वच स्तरावर ह्यतंबाखूमुक्तीह्णबाबत जनजागृती करणार आहे. या जनजागृती अभियानाची सुरुवात एन.सी.सी. कॅडेट हे स्वत:च्या कुटुंबापासून करणार आहेत. या नंतर परिसरातील नागरिक, मित्र, नातेवाईकांमध्ये अशाप्रकारे या विशेष जनजागृती अभियानाला प्रारंभ होणार आहे. तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.