शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

नेकलेस रस्त्याचे होणार रुंदीकरण; मनपाने केले मार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 13:40 IST

अकोला: बहुप्रतीक्षित नेकलेस रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रांरभ केला जाणार असून, महापालिकेच्या नगररचना विभागाने मार्किंगद्वारे रस्त्याचा मध्यबिंदू (सेंटर पॉइंट) निश्चित केला.

अकोला: बहुप्रतीक्षित नेकलेस रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रांरभ केला जाणार असून, महापालिकेच्या नगररचना विभागाने मार्किंगद्वारे रस्त्याचा मध्यबिंदू (सेंटर पॉइंट) निश्चित केला. रस्त्यालगतचे वृक्ष हटविण्याचे काम मनपाच्या स्तरावर पूर्ण केले जाणार आहे. विजेचे खांब, रोहित्र हटवून भूमिगत वीज वाहिनीसाठी महावितरण कंपनीने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून निधीचा ओघ सुरूच आहे. प्राप्त निधीतून शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण तसेच एलईडी पथदिव्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते. सिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट आॅफिस, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, धिंग्रा चौक ते सिटी कोतवाली ते थेट किल्ला चौक, अशोक वाटिका ते सरकारी बगिचा, श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉटपर्यंत मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नेहरू पार्क ते थेट संत तुकाराम चौकापर्यंत होणाºया गोरक्षण रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच धर्तीवर आता सिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट चौकापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणाºया मालमत्तांचे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपा प्रशासन सक्रिय झाले आहे. शुक्रवारी सकाळी नगररचना विभागातील संदीप गावंडे व त्यांच्या चमूने विकास आराखड्यानुसार रस्त्याचे मोजमाप करून ‘सेंटर’ निश्चित केले. त्यावेळी नगरसेवक आशिष पवित्रकार व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.भूमिगत वीज वाहिनीचे काम महावितरणकडे!सिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट ते दुर्गा चौकापर्यंत १२०० मीटर अंतरावरील रस्त्यालगतचे विद्युत खांब, रोहित्र हटवून भूमिगत वीज वाहिनीचे जाळे टाकल्या जाणार आहे. सदर काम महावितरण कंपनीकडे सोपविण्यात आले असून, यावर ३ कोटी १४ लाख रुपये खर्च होतील. या कामासाठी तब्बल सात टक्के जादा दराने निविदा मंजूर करण्यात आली, हे येथे उल्लेखनीय.

रस्त्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकारसिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना प्राप्त २५ कोटींच्या निधीतून तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम मंजूर करण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रकाशित केली असता ओबेरॉय नामक कंत्राटदाराची निविदा मंजूर करण्यात आली आहे.१५ मीटर रुंद रस्त्यावर ‘एलईडी’चा झगमगाटसिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट चौकापर्यंत ८२२ मीटर अंतरापर्यंत १५ मीटर रुंद असा प्रशस्त सिमेंट रस्ता तयार होणार आहे. त्यावर लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे लावल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रतनलाल प्लॉट ते दुर्गा चौकापर्यंत रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला जाईल. 

नेकलेस रस्त्याची तातडीने मार्किंग करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते. रस्त्यालगतचे वृक्ष हटविण्यासाठी शहर अभियंत्यांना सूचना केल्या आहेत. वृक्ष हटविल्यानंतर विद्युत पोल हटविल्या जातील. त्यानंतर रस्ता रुंदीकरणाला प्रारंभ होईल.-विजय अग्रवाल, महापौर.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका