शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादीचा ‘एल्गार’!

By admin | Updated: January 10, 2017 02:29 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे

अकोला, दि. ९-नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांसमोरअनेक समस्या निर्माण झाल्याने, नोटाबंदीच्या विरोधात एल्गार पुकारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्ह्याच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतमालाचे भाव कमालीने घसरले असून, आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यवहाराची समस्या निर्माण झाली आहे. वेळेवर मजुरी मिळत नसल्याने शेतमजुरांचे हाल होत आहे. शेतकर्‍यांना रब्बी पिकांसाठी बियाणे, खते व कीटकनाशके मिळण्यासाठी प्रचंड आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जिल्हा सहकारी बँक व पतसंस्थांवर आर्थिक निर्बंध घालण्यात आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. काळा पैसा शोधता-शोधता जवळपास ९७ टक्के जुन्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्याने नोटाबंदीचा निर्णय सपशेल फसला आहे. असा आरोप करत नोटाबंदीमुळे निर्माण झालेली अस्थिरता व अडचणींचा विचार करून, शासनाने तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, श्रीकांत पिसे पाटील, राजीव बोचे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, ऋषिकेश पोहरे, डॉ.आशा मिरगे, पद्मा अहेरकर, मंदा देशमुख, कैलाश गोंडचवर, मनोहर दांदळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हय़ातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.