शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी करणार अकोला पूर्व मतदारसंघावर दावा!

By admin | Updated: August 12, 2014 01:00 IST

राज्यस्तरावर आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसमध्ये सहमती झाली असली तरी, अकोला जिल्हय़ात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस दोन विधानसभा जागांवर दावा करणार

अकोला : राज्यस्तरावर आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसमध्ये सहमती झाली असली तरी, अकोला जिल्हय़ात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस दोन विधानसभा जागांवर दावा करणार असून, यामध्ये मूर्तिजापूर या राखीव जागेसह अकोला पूर्व मतदारसंघाचा समावेश राहणार आहे. यासाठी जिल्हय़ातील एका ज्येष्ठ नेत्याने शरद पवार यांच्याकडे फिल्डिंग लावली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जिल्हय़ातील वातावरण ढवळून निघाले असून, प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. तसेच वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. अकोला जिल्हय़ातील अकोला पूर्व, पश्‍चिम, मूर्तिजापूर, बाळापूर,आकोट असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी मूर्तिजापूर मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला आहे. पूर्वी सर्वसाधारण उमेदवारासाठी असलेला हा मतदारसंघ गत विधानसभा निवडणुकीपासून अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इतर सर्वसाधारण इच्छुक उमेदवारांची गोची झाली आहे. त्यामुळे मराठाबहुल असलेल्या अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा आहे. आघाडीचा उमेदवार गत पंचवीस वर्षात या ठिकाणाहून निवडून आला नसल्याचे पवार यांच्या निदर्शनात या ज्येष्ठ नेत्याने आणून दिले आहे. दुसरीकडे काँग्रेसने या मतदारसंघात जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेसमध्ये या मतदारसंघातून तिकीट मागणार्‍यांची यादी मोठी आहे. राष्ट्रवादीकडे सध्या या मतदारसंघातून निवडणूक लढवायला दोघे इच्छुक आहेत. त्यामुळे आघाडीतील ही जागा कोणाला जाते, याकडे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.