शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

मालकाचा विश्‍वासघात करणा-या नोकरास सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 02:34 IST

शहरातील उद्योजक बियाणी यांचे ८0 हजार रुपये रोख आणि चार धनादेश घेऊन पळून जाणा-या त्यांच्या नोकरास तीन वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा.

अकोला, दि. २0-शहरातील उद्योजक बियाणी यांचे ८0 हजार रुपये रोख आणि चार धनादेश घेऊन पळून जाणार्‍या त्यांच्या नोकरास प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्‍वेता चांडक यांच्या न्यायालयाने सोमवारी तीन वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपी नोकरास ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असून आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.नीलेश श्यामसुंदर बियाणी यांच्या राधा उद्योग, राधा पल्सेस, राधा एंटरप्रायजेस आणि बियाणी फुड्स या प्रतिष्ठानांमधील बँकेचे कामकाज सांभाळण्यासाठी नीलेश पन्नालाल शहा नामक व्यक्ती होता. नेहमीप्रमाणे तो बँकेचे व्यवहार सांभाळत असल्याने नीलेश बियाणी यांनी १८ ऑगस्ट २00९ रोजी त्याला बँकेत जमा करण्यासाठी ८0 हजार रुपये रोख दिले आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी ४ धनादेश दिले. या प्रत्येक धनादेशाद्वारे एक लाख २५ हजार रुपये, ४0 हजार रुपये, ५0 हजार रुपये आणि १ लाख ६0 हजार रुपये बँकेतून काढण्याचे सांगितले होते. नीलेश शहा हा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचे धनादेश आणि ८0 हजार रुपये रोख घेऊन पसार झाला होता. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी नीलेश शहा याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४0८ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी चांडक यांनी या प्रकरणी नऊ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी नीलेश शहा यास दोषी ठरवित त्याला तीन वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपी नोकरास ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असून ८ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.प्रथमच नुकसान भरपाईचे आदेशया तांत्रिक मुद्दय़ांनी किचकट असलेल्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक तथा सध्या बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख विलास पाटील यांनी केला होता. त्यांनी तपास पूर्ण केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने पोलिसांचा तपास आणि योग्यरीत्या दोषारोपपत्र असल्याचे स्पष्ट केल्यानंतर विश्‍वासघात करणार्‍या आरोपीस तीन वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उपअधीक्षक विलास पाटील यांच्या तपासामुळे न्यायालयाने प्रथमच अशा प्रकरणात ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.