शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशी बीटी कापूस फुलला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:39 IST

अकोला : देशातील पहिला देशी बीटी कापूस बहरला आहे. हे  पांढरे सोने वेचणीला आले आहे; पण मजूरच उपलब्ध नसल्याने  या कापसाचे नुकसान होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी देशी बीटीची चाचणी घेण्यात येत  आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर बियाणे शेतकर्‍यांसाठी खुले  करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपांढरे सोने आले वेचणीला; पण मजूरच नाहीत!कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी देशी बीटीची चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील पहिला देशी बीटी कापूस बहरला आहे. हे  पांढरे सोने वेचणीला आले आहे; पण मजूरच उपलब्ध नसल्याने  या कापसाचे नुकसान होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी देशी बीटीची चाचणी घेण्यात येत  आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर बियाणे शेतकर्‍यांसाठी खुले  करण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने  मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित  केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये  बीजी-२ चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले  आहे. याकरिता हैदराबाद येथील बियाणे संशोधन संस्थेसोबत  संशोधनाचा सामंजस्य करार करण्यात आला होता. या वाणाला  केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, या बियाण्याची चाचणी  घेण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  अकोल्यात मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत  असलेल्या पश्‍चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर चाचणीसाठी या  बियाण्याची पेरणी करण्यात आली आहे. या पिकांची वाढ पाऊस नसताना सूक्ष्म सिंचनाच्या पाण्यावर  झाली असून, हे झाड ४ ते ५  फुटांचे झाले आहे. आता या  झाडांना कापूस आला आहे. पांढर्‍याशुभ्र कापसामुळे काळय़ा  आईने पांढरे वस्त्र परिधान केले आहे; पण सलग दोन महिन्यां पासून या कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांचा संप सुरू   असल्याने सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता हा  कापूस वेचणीला आला आहे; पण मजूरच उपलब्ध नसल्याने  कापसाची गळती सुरू  आहे. 

बीटी कापसाचे पीक जोरात असून, वेचणीला आले आहे. मजूर  संपावर असल्याने कंत्राटी मजूर लावून या कापसाची वेचणी  करावी लागणार आहे.- डॉ. दिलीप एम. मानकर,संचालक, संशोधन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.