शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजारांच्या कर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांचा ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:35 IST

अकोला जिल्ह्यात २८ जुलैपर्यंत तीन बँकांमार्फत केवळ २३४ शेतक-यांना १० हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला.

ठळक मुद्देदीड महिना उलटलाअकोला जिल्ह्यात केवळ २३४ शेतक-यांना लाभ

संतोष येलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतक-यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याचा आदेश शासनामार्फत दीड महिन्यापूर्वी काढण्यात आला; मात्र जिल्ह्यात २८ जुलैपर्यंत तीन बँकांमार्फत केवळ २३४ शेतकºयांना १० हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये स्टेट बँक वगळता जिल्ह्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे दहा हजार रुपयांच्या कर्ज वाटपास जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठेंगा दाखविल्याचे वास्तव समोर येत आहे.सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शासनामार्फत जाहीर करण्यात आली. कर्जमाफीसंदर्भात गत २८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यापूर्वी थकबाकीदार शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनामार्फत गत १४ जून रोजी देण्यात आला.त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना गत १६ जून रोजी दिले. दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र २८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक आणि स्टेट बँक आॅफ इंडिया या तीन बँकांमार्फत जिल्ह्यातील केवळ २३४ थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. स्टेट बँक आॅफ इंडिया वगळता जिल्ह्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपयांचे तातडीचे कर्ज वाटप अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे शासन आदेशानुसार थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपयांचे तातडीचे कर्ज वाटपास जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून ठेंगा दाखविण्यात आल्याची बाब समोर येत आहे.कर्जाचे असे केले वाटप!बँक                                        शेतकरीजि.म.सहकारी बँक                    ४६विदर्भ-कोकण ग्रामीण बँक        ११८स्टेट बँक आॅफ इडिया                ७०एकूण                                     २३४शासन आदेशानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांना दहा हजार रुपये मर्यादेपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. २८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक व स्टेट बँक आॅफ इंडिया या तीन बँकांमार्फत २३४ शेतकºयांना दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.-जी.जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).