शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांकडून मिळेना थकबाकीदार शेतक-यांची माहिती!

By admin | Updated: July 2, 2017 09:27 IST

कर्जमाफीची अंमलबजावणी ; शासनाकडे माहिती पाठविण्याची प्रक्रिया रखडली.

अकोला: शासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीत जिल्हा उपनिबंधकांनी (डीडीआर) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागितली आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून माहिती प्राप्त झाली; मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून शनिवारपर्यंतही थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती ह्यडीडीआरह्णकडे सादर करण्यात आली नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया रखडली आहे.राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात २८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शासन निर्णयातील कर्जमाफीच्या निकषानुसार, १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानुसार गत १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी आणि ३० जून २०१६ व ३० जून २०१७ पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हा उपनिबंधकांना (डीडीआर) देण्यात आला. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती ३० जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना गत गुरुवारी दिले. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकबाकीदार शेतकरी आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती शुक्रवारी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आली; मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती शनिवारपर्यंतही सादर करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती राष्ट्रीयकृत बँकांकडून जिल्हा उपनिबंधकांकडे केव्हा सादर केली जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकबाकीदार शेतकरी आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती प्राप्त झाली; मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अद्याप मिळाली नाही.- जी.जी. मावळेजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)