शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:28 IST

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेणार्‍या गोरगरीब पालकांच्या पाल्यांना शासनाकडून गणवेश घेण्यासाठी ४00 रुपयांची रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते. परंतु, हे अनुदान मिळविण्यासाठी पाल्य, आई, वडिलांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असण्याची सक्ती करण्यात येत असल्याने पालक व पाल्य त्रस्त झाले आहेत.  

ठळक मुद्देगणवेशाचे अनुदान ठरतेय डोकेदुखी ग्रामीण भागात बँक नसल्याने पालक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेणार्‍या गोरगरीब पालकांच्या पाल्यांना शासनाकडून गणवेश घेण्यासाठी ४00 रुपयांची रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते. परंतु, हे अनुदान मिळविण्यासाठी पाल्य, आई, वडिलांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असण्याची सक्ती करण्यात येत असल्याने पालक व पाल्य त्रस्त झाले आहेत.  हे अनुदान पाल्य, आई, वडिलांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँक खाते असल्याशिवाय मिळत नसल्यामुळे बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण परिसरात ३0 किमी अंतरावर निंबा किंवा लोहारा येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा असल्याने गणवेषाचे  ४00 रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी पालकांना त्यांच्या जवळचे ३00 रुपये खर्च करण्यासोबत नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून, या शाळेत केवळ  गोरगरीब शेतकरी व  शेतमजुरांची मुले शिक्षण घेत आहेत. बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण या परिसरात ३0 किमी अंतरापेक्षा कमी अंतरावर कुठलीही राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्यामुळे या भागातील मोलमजुरी करणार्‍या शेतमजुरांना मजुरी बुडवून एका किंवा दोन मुलांसह  बँकेत जावे लागत आहे. यासाठी त्याला प्रवास भाड्यासाठी ३00 रुपये खर्च करावे लागत आहेत. एवढे करूनही एका चकरेत बँकेत खाते उघडले जात नाही. त्यामुळे किमान दोन चकरा कराव्या लागत आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी त्या खातेदारांना अनामत म्हणून पाचशे रुपये खात्यात जमा करावे लागतात. यात त्या शेतमजुराची दोन दिवसाची बुडणारी मजुरी पकडली, तर शासनाकडून मिळणार्‍या ४00 रुपयांच्या अनुदानासाठी शेतमजुरांना जवळचे एक हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने शासनाकडून गणवेशासाठी मिळणारे ४00 रुपयाचे अनुदान मदत नव्हे, डोकेदुखी ठरत आहे.  याच जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकाचे वेतन बोरगाव वैराळे, सोनाळा परिसरात सहा किमी अंतरावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हातरुण शाखेत होत असताना विद्यार्थ्यांचे गणवेशाचे अनुदान जमा करण्यासाठी या बँकेतील खाते का चालत नाही, असा प्रश्न संतोष सूर्यवंशी या पालकाने  विचारला असता वरिष्ठांकडून राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची अट असल्याचे मुख्याध्यापक श्रीकांत कोल्हे यांनी सांगितले. मात्र, या अटीमुळे गोरगरीब पालक त्रस्त झाले असून, ही त्रासदायक अट रद्द करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हातरुण शाखेत खाते उघडून त्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्याची तरतूद करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम डोंगरे यांनी केली आहे.

गोरगरीब विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेशासाठी ४00 रुपयांची रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची तरतूद आहे. सदर रक्कम विद्यार्थ्यांना देण्यासाठी पालक व पाल्य यांचे संयुक्त बँक खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असले पाहिजे, अशी सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याशिवाय गणवेशाची रक्कम मिळणार नाही, असे मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. - जी.व्ही. बडवे, गटशिक्षणाधिकारी, बाळापूर.

टॅग्स :bankबँक