शहरं
Join us  
Trending Stories
1
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
2
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
3
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
4
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
5
प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
6
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
7
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
8
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
10
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
11
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
12
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
13
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
14
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
15
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
16
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
17
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
18
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
19
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
20
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 

एरंडीसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेतली दखल

By admin | Updated: March 9, 2015 01:42 IST

राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना नोटीस.

बुलडाणा : होळी करण्याच्या जुन्या प्रथेतून जैवविविधतेचा महत्वाचा भाग असलेल्या एरंडीच्या झाडांनाच आपण नष्ट करतोय का ? अशी विचारणा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने राज्य शासनाच्या जैवविविधता मंडळाकडे ६ मार्च रोजी (स्टेट बायो-डायव्हरसिटी बोर्ड) केली आहे. होळीच्या दिवशी वनऔषधी म्हणून उपयोगात येणार्‍या एरंडीची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने ४ मार्च रोजी प्रकाशित करुन शासन व पर्यावरणप्रेमींचे याकडे लक्ष वेधले होते हे विशेष. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत पुणे येथील अँड. असीम सरोदे, अँड. विंदा विलास राऊत-महाजन, अँड. सचिन विवेक गुप्ते, अँड.अलका बबलादी, अँड. स्मिता सरोदे-सिंगलकर, अँड. सविता खोटरे, अँड. रोशनी वानोड यांनी एकत्रितपणे जैवविविधता जपण्याचा विचार अधोरेखित करण्यासाठी एरंडीच्या झाडांबाबतची याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग, राज्य जैवविविधता मंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेच्या सुनावणीनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगांवकर व डॉ.अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकांना शुक्रवारी ही नोटीस जारी केलीे. महाराष्ट्रात ९ हजार हेक्टर क्षेत्रात असलेली बहुमुल्य वनऔषधी एरंडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेताच्या बांधावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटींचे उत्पन्न मिळवून देणार्‍या एरंडीच्या झाडांचा होळीच्या दिवशी करण्यात येणारा वापर जरी सदर पर्यावरण याचिकेचा विषय असला तरी एरंडीच्या अस्तित्वाबाबतचा प्रश्न व्यापकपणे मांडण्यात आला आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २२ नुसार राज्य सरकारने राज्य जैवविविधता मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्रात मागील ४ वर्षापासून जैवविविधता मंडळ स्थापन करण्यात आले आहे. परंतु हे मंडळ कार्यरत आहे की, नाही संशोधनाचा विषय असल्याचे याचिकेत म्हटले आहे. जैवविविधता कायदा २00२ च्या कलम २४ नुसार राज्य जैवविविधता मंडळाने जैवविविधता नष्ट होणार्‍या कृतींना आळा घालणे आणि जैवविविधता संवर्धनासाठी काम करणे अपेक्षीत आहे. परंतु तशा पद्धतीचेही काम होताना दिसत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते अँड. असीम सरोदे यांनी म्हटले.

*असे आहे एरंडीचे महत्व

      कोरडवाहू शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, पपई, द्राक्ष, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती कीडनाशक म्हणून तसेच पारंपारिक औषधी तयार करण्यासाठी एरंडीचा वापर केला जातो. एरंड या वनस्पतीच्या बीया, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडी वनऔषधीमुळे शहरातील वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, वस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश होतो.