शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शैक्षणिक संस्था पूर्व विदर्भातच का?

By admin | Updated: May 28, 2016 01:59 IST

मुख्यमंत्री महोदय, जरा पश्‍चिम विदर्भाकडेही बघा..!

डॉ.किरण वाघमारे /अकोलाकेंद्रीय मंत्रिपद नितीन गडकरी यांना आणि मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्याबरोबर विदर्भात विकासाची गंगा वाहू लागली आहे. अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय संस्थांची उभारणी विदर्भात होऊ लागली आहे; परंतु विकासाची ही गंगा पूर्व विदर्भातच का? पश्‍चिम विदर्भात या विकासरूपी गंगेचा प्रवाह कधी येणार? याची प्रतीक्षा पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील रहिवाशांना आहे. आज दोन्ही नेत्यांच्या कृपेमुळे नागपूर हे नवीन ह्यएज्युकेशन हबह्ण म्हणून उदयाला येत आहे; परंतु त्याचवेळी पश्‍चिम विदर्भाच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली आहे. महाराष्ट्राचाच भाग असलेल्या विदर्भाला मागील अनेक वर्षांपासून उपेक्षाच सहन करावी लागली. सर्व परिस्थिती अनुकूल असतानादेखील केवळ राजकीय उदासीनता यामुळे विदर्भाला उपेक्षेचे चटके सहन करावे लागत आले; परंतु दोन वर्षांपूर्वी केंद्रात सत्तापरिवर्तन झाले आणि विदर्भाचे भाग्य उजळले. नितीन गडकरींच्या रूपाने एक वजनदार खात्याचा मंत्री केंद्रात गेला आणि त्यांनी विदर्भाची उपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला. गडकरींच्या पाठोपाठ राज्यात मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आणि विदर्भाच्या विकासाला गती मिळाली. या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नातून अनेक संस्था विदर्भात उभ्या राहू लागल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल लॉ स्कूल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फरमेशन टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या शैक्षणिक संस्था या मागील दोन वर्षांत सुरू झाल्या आहेत. नॅशनल अँकेडमी ऑफ डायरेक्ट टॅक्स, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल फायर इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट या संस्था पूर्वीपासूनच नागपुरात आहेत. याशिवाय जुन्याच असलेल्या विश्‍वेश्‍वरय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीला आय.आय.टी. चा दर्जा मिळाला आहे. या सर्व शैक्षणिक संस्थांमुळे नागपूर आता 'एज्युकेशन हब' झाले आहे. पूर्व विदर्भात राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले जात असताना पश्‍चिम विदर्भ मात्र दुर्लक्षित आहे.