अकोला: सीए आयपीसीसी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यामध्ये अकोल्यातील रूपम विनोद बोर्डे हा राष्ट्रीय पातळीवर ४५ व्या स्थानावर, तर प्रशस्ती प्रशांत लोहिया हिने ४६ वे स्थान पटकाविले. सीए सीपीटीच्या निकालानंतर सोमवारी सीए आयपीसीसी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंनी राष्ट्रीय पातळीवर बाजी मारली आहे. यामध्ये मूर्तिजापूर येथील रहिवासी रूपम बोर्डे याला ७00 पैकी ४५८ गुण मिळाले असून, त्याने राष्ट्रीय पातळीवर ४५ वे स्थान पटकाविले, तर प्रशस्ती लोहिया हिने ४६ वे स्थान पटकाविले. प्रशस्ती ही सीए प्रशांत लोहिया यांची मुलगी व टॅक्स प्रॅक्टिशनर अँड. कैलास लोहिया यांची नात आहे. रूपमने आपल्या यशाचे श्रेय नीरज राठी यांना, तर प्रशस्तीने आई-बाबा, आजोबा व नीजर राठी, सचिन बुरघाटे यांना दिले. या दोन्ही विद्यार्थ्यांंंसोबतच सीए आयपीसीसीचे दोन्ही ग्रुप उत्तीर्ण करणार्यांमध्ये मयूरी मानधने, विनीत चरखा, निकिता राठी, वैष्णवी बिसेन, जय डांगरा, यश महर्षी यांचा समावेश आहे. या वर्षीची परीक्षा कठीण असल्याने यंदा परीक्षेचा निकाल केवळ ४.४१ टक्के लागला आहे.
सीए परीक्षेत अकोल्यातील रूपम व प्रशस्ती राष्ट्रीय स्तरावर
By admin | Updated: February 2, 2016 01:58 IST