शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ प्रणालीमध्ये नाव नसल्याने, शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 13:59 IST

अकोला: शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे दोन शिक्षकांचे नोव्हेंबर २0१६ पासून वेतन थकीत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाºयांकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.येथील क्रांतिज्योती मराठी प्राथमिक ...

अकोला: शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे दोन शिक्षकांचे नोव्हेंबर २0१६ पासून वेतन थकीत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाºयांकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.येथील क्रांतिज्योती मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षक अमोल रामदास मडावी व संजय भीमराव धोत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात न आल्यामुळे त्यांचे नोव्हेंबर २0१६ पासून वेतन थकीत आहे. त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव शाळेने २६ आॅक्टोबर २0१६ रोजी अधीक्षक वेतन पथक यांच्याकडे सादर केला होता. परंतु, त्यात काही त्रुटी होती. त्यानंतर दोन्ही शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी व शिक्षक उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त त्रुटींची पूर्ततादेखील केली; परंतु त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आली नाहीत. या दोन्ही शिक्षकांनी वारंवार शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न केले. त्रुटीसुद्धा दूर केल्या; परंतु त्यानंतरही जाणीवपूर्वक शालार्थ प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करण्यात येत नसल्याने, त्यांचा गत दहा महिन्यांपासून पगार रखडला आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळीपूर्वी त्यांना त्यांचे नियमित व थकीत वेतन न मिळाल्यास आत्मदहन करू, असा इशारा शिक्षक अमोल मडावी व संजय धोत्रे यांनी दिला आहे. या शिक्षकांनी पालकमंत्री, जिल्हाधिकाºयांकडेसुद्धा तक्रारी केल्या आहेत. (प्रतिनिधी)