शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाउन नावालाच बारमध्ये उशिरापर्यंत झिंगाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:19 IST

अकाेला : काेराेना संसर्ग पाहता ३० जानेवारीपर्यंत जिल्ह्यात सुरू असलेले बार, वाईन शाॅपच्या वेळा निर्धारित करण्यात आल्या आहेत. परंतु ...

अकाेला : काेराेना संसर्ग पाहता ३० जानेवारीपर्यंत जिल्ह्यात सुरू असलेले बार, वाईन शाॅपच्या वेळा निर्धारित करण्यात आल्या आहेत. परंतु लाेकमतने १८ जानेवारी राेजी रात्रीच्या दरम्यान पाहणी केली असता या वेळेचे बंधन पाळले जात नसल्याचे दिसून आले.

काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही नियम, अटी व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून वाईन शाॅप, बिअर शाॅप सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत, तर परमिट रूम सकाळी ११.३० ते रात्री १० वाजेपर्यंत वेळ निर्धारित करण्यात आली आहे. तसेच देशी दारूची दुकाने सकाळी ८ वाजता उघडून रात्री १० वाजेपर्यंत बंद करण्याची वेळ आहे. परंतु लाेकमत चमुने १८ जानेवारी राेजी रात्री शहरातील व शहराबाहेरील काही वाईन बारची पाहणी केली असता काहींनी वेळेवर, तर काहींनी बाहेरून दरवाजा बंद करून आतून दुकाने सुरू ठेवल्याचे दिसून आले. यामध्ये शहरातील बाभुळगाव राेडवरील वाइन बार, गायगाव राेडवरील बार, खडकी परिसर, आकाेट फैल, शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बारचा समावेश आहे. दरवाजा बंद असल्यानंतरही चाैकीदाराला सांगून दरवाजा उघडून ग्राहकांना आत घेण्याची व्यवस्था काही ठिकाणी दिसून आली.

(प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय?

अबकारी अनुज्ञप्त्यांना ५० टक्के क्षमतेनुसार निर्धारित वेळेनुसार काेविड १९ संदर्भात वेळाेवेळी जाहीर केलेल्या अटी, शर्ती व मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून बार, वाईन शाॅप सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

एफएल ३ (परमिट रूम) सकाळी ११.३० ते रात्री १०, वाईन शाॅप, बिअर शाॅप सकाळी १० ते रात्री १०, देशी दारू सकाळी ८ ते रात्री १० वाजपर्यंत वेळ निर्धारि केली आहे.

वाईन बार बिअर बारची संख्या १४४

काेट

शहरात किंवा शहराबाहेर कुठेही वेळेनंतर वाईन शाॅप, वाईन बार, बिअर बार सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी एक पथकच कार्यरत आहे. तसेच कुणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी. यावरून कारवाई करण्यात येईल.

स्नेहा सराफ

अधीक्षीका राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकाेला

शहरात

शहरातील वाईन बार तसेच बिअर बार वेळेत बंद हाेत असले तरी काहीजण मात्र वाईन शाॅपच्या समाेर उभे राहून विक्री करीत असल्याचे दिसून आले, तर आतमध्ये असलेल्या काही वाईन शाॅपमध्ये खुलेआम विक्री सुरु हाेती. बिअर बार आणि वाईन बार आतून सुरू बाहेरून बंद असल्याचे वास्तव आहे.

शहराबाहेर

शहराबाहेर दारू विक्री व त्यांना बसण्याची व्यवस्था खुलेआम असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीत दिसून आले. काेणाचेही निर्बंध त्यांच्यावर नसल्याचेच शहराबाहेरील वाईन बार, बिअर बार व वाईन शाॅपमधील स्थितीवरून स्पष्ट झाले. यावरून पाेलीस व उत्पादन शुल्क विभागाने शहराबाहेरील बार व शाॅप संचालकांना सूटच दिल्याचे चित्र आहे.