शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’च्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक!

By admin | Updated: April 21, 2017 02:03 IST

अकोला : खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर झाले; पण ‘एटीएम’मध्ये ‘कॅश’ उपलब्ध नसल्याने, मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही.

पीक कर्ज मंजूर; पण रक्कम मिळेनाअकोला : खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर झाले; पण ‘एटीएम’मध्ये ‘कॅश’ उपलब्ध नसल्याने, मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे रोखरहित (कॅशलेस) व्यवहाराच्या नावाखाली पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवून कर्जाची रक्कम देण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सन २०१७-१८ यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकमार्फत १ हजार १४० कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी सभासद असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील १७ हजार ७४७ शेतकऱ्यांना १३५ कोटी ६७ लाख २१ हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर करण्यात आले. शासनाच्या रोखरहित (कॅशलेस) धोरणानुसार पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी रोख रकमेऐवजी ‘किसान क्रेडिट कार्ड’ दिले जात आहे; परंतु शेतकऱ्यांना शेतीची मशागत, मजुरांना द्यावयाची मजुरी, मुला-मुलींचे लग्न व इतर खर्च भागविण्यासाठी रोख रकमेची गरज असल्याच्या पृष्ठभूमीवर मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा ‘एटीएम’मध्ये लागत आहेत; मात्र ‘एटीएम’मध्ये पैसे नसल्याने, पीक कर्ज मंजूर झाले असले, तरी रक्कम मिळत नसल्याने खर्च भागविण्यासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर ‘कॅशलेस’च्या नावाखली पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असून, मंजूर करण्यात आलेल्या पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ‘एटीएम’मध्ये रक्कम उपलब्ध करून कर्जाच्या रकमेमुळे होणारी अडवणूक थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अनेक शेतकऱ्यांकडे नाही ‘एटीएम कार्ड’!पीक कर्ज मंजूर झालेले शेतकरी कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना ‘एटीएम’मध्ये चकरा माराव्या लागत आहेत; मात्र जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडे ‘एटीएम कार्ड’ उपलब्ध नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या पीक कर्जाची रक्कम काढणार कशी आणि खर्च भागविणार कसा, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.‘कॅश’अभावी ‘एटीएम’मध्ये ठणठणाट; शेतकरी हतबल!जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १७ एप्रिलपर्यंत १३५ कोटी ६७ लाख २१ हजार रुपयांचे खरीप पीक कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानुसार मंजूर पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ४२ ‘एटीएम’मध्ये रांगा लागत आहेत; मात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाची रक्कम देण्यासाठी एटीएममध्ये रक्कम उपलब्ध नाही. ‘कॅश’अभावी ‘एटीएम’मध्ये ठणठणाट असल्याने पीक कर्जाच्या रकमेसाठी शेतकरी हतबल झाला आहे.