शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

हद्दवाढ क्षेत्रातील विठ्ठलनगर, फत्तेपूरवाडीत नाल्याचे सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:13 IST

२०१७ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीला ध्यानात ठेवून तत्कालीन भाजप-सेना युतीच्या कालावधीत सप्टेंबर २०१६ मध्ये महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करण्यात आली. ...

२०१७ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीला ध्यानात ठेवून तत्कालीन भाजप-सेना युतीच्या कालावधीत सप्टेंबर २०१६ मध्ये महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करण्यात आली. त्यावेळी या निर्णयाचा राजकीय लाभ भाजपच्या पथ्यावर पडला. शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या बहुतांश सर्वच प्रभागात भाजपने एकहाती विजय मिळवला. यादरम्यान,

या भागातील विकासकामांसाठी तत्कालीन राज्य सरकारने ९६ काेटी २० लक्षचा निधी मंजूर केला. त्यामधून रस्ते, नाल्या, सामाजिक सभागृहाच्या बांधकामांना सुरुवातही करण्यात आली. परंतु नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या अद्यापही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील विठ्ठलनगर, फत्तेपूरवाडी, लाेखंडे ले-आउट, जामाेदकर ले-आउट,स्मशानभूमीचा मागील भाग आदी परिसरांतून वाहणाऱ्या माेठ्या नाल्याची दुरुस्ती व साफसफाई न झाल्यामुळे पावसाळ्यात या भागात सांडपाण्याची समस्या निर्माण हाेते. सर्व्हिस लाइनमधील नाल्या व माेठ्या नाल्याच्या साफसफाईकडे मनपा प्रशासनासह भाजप नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याने समस्येत भर पडल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

हद्दवाढ झाल्यानंतर फत्तेपूरवाडीतील समस्या निकाली निघतील, ही अपेक्षा हाेती. परंतु मागील पाच वर्षांपासून आजपर्यंतही माेठ्या नाल्याचे बांधकाम न झाल्यामुळे आम्हाला पावसाळ्यात नानाविध संकटांचा सामना करावा लागत आहे. या समस्येबद्दल अनेकदा अवगत केल्यानंतरही प्रशासनासह नगरसेवकांचे दुर्लक्ष हाेत आहे.

- नंदकिशाेर काठाेळे, रहिवासी, प्रभाग ४

पावसाळा सुरू हाेण्यापूर्वी नगरसेवकांनी नालासफाईसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. तसे हाेताना दिसत नाही. आमच्या समस्यांकडे कानाडाेळा केला जात असून, पावसाळ्यात अंगणात व घरात सांडपाणी शिरते. यामुळे आराेग्य धाेक्यात आले आहे.

-त्र्यंबक पांढरे रहिवासी प्रभाग ४

मनपा क्षेत्रात सामील हाेण्याला पाच वर्षांचा कालावधी हाेत आला तरी समस्या जैसे थे आहेत. नालेसफाईसाठी नगरसेवकांकडून ठाेस प्रयत्न हाेत नसल्याने आम्हाला समस्येचा सामना करावा लागत आहे. समस्या विचारण्यासाठी नगरसेवक फिरकतही नाहीत.

- सुनीता पखान, रहिवासी, प्रभाग-४

प्रभागात निर्माण हाेणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करणे नगरसेवक व प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. सर्व्हिस लाइनमधील नाल्यांच्या सफाईकडे पाठ फिरवल्याने पावसाळ्यात घाण सांडपाणी घराच्या भिंतीतून पाझरते. यामुळे घरात जीवजंतू प्रवेश करतात. नगरसेवकांनी समस्येची जाणीव ठेवावी.

- वनमाला राऊत, रहिवासी, प्रभाग-४

उमरी भागातून न्यू तापडिया नगरकडे वाहणाऱ्या माेठ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामाला न्यू तापडिया परिसरातून प्रारंभ झाला आहे. लवकरच माेठी उमरी, विठ्ठल नगर, फत्तेपूरवाडी भागातील नाल्याची साफसफाई केली जाणार आहे.

- विजय पारतवार, क्षेत्रीय अधिकारी, पूर्व झाेन