शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

नकाशीचे सरपंच अपात्र; शाळकरी मुलाला मजूर दाखवणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 14:15 IST

नकाशी ग्राम पंचायतचे सरपंच रवींद्र शेषराव मुरुमकार यांना सरपंच पदावरून काढून टाकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाला रोहयोचा मजूर दाखवून अनुदान लाटल्याप्रकरणी नकाशी ग्राम पंचायतचेसरपंच रवींद्र शेषराव मुरुमकार यांना सरपंच पदावरून काढून टाकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिला आहे. नकाशी येथील विजय वायधन तायडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हे आदेश न्यायालयाने दिले आहेत.ग्राम पंचायत नकाशीचे सरपंच रवींद्र शेषराव मुरुमकार यांनी त्यांचा मुलगा विवेक रवींद्र मुरुमकार यांच्या नावे जॉबकार्ड तयार करून त्याला रोजगार हमी योजनेंतर्गत मजूर दाखविले, तसेच सिंचन विहिरीचा २ लाख ९९ हजार ९२७ रुपयांचा लाभ घेतला. त्यांपैकी रक्कम रु. ४० हजार ११६ व ६४ हजार ०५५ ही रक्कम २९.०९.२०१५ रोजी म्हणजे आॅगस्ट २०१५ मध्ये सरपंच झाल्यानंतर स्वीकारली. वस्तुत: रवींद्र मुरुमकार यांचा मुलगा विवेक मुरुमकार हा प्रभात किड्स अकोला या शाळेमध्ये इयत्ता नववीमध्ये त्यावेळी शिकत होता. असे असताना रोजगार हमी योजनेचा मजूर दाखवून सिंचन विहिरीचा गैरकायदेशीर लाभ सरपंच पदावर निवडून आल्यानंतर घेतल्यामुळे नकाशी येथील विजय वायधन तायडे यांनी महाराष्टÑ अधिनियम, १९५९ चे कलम ३९ (१) (एक) अन्वये याचिका विभागीय आयुक्त अमरावती व नंतर अपील राज्य ग्रामविकास मंत्री महाराष्टÑ राज्य यांच्याकडे दाखल केली होती; परंतु विभागीय आयुक्त यांनी अर्ज नामंजूर केल्यामुळे व राज्य ग्रामविकास राज्यमंत्री महाराष्टÑ राज्य यांनी अपील नामंजूर केल्यामुळे विजय वायधन तायडे यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये रिट याचिका दाखल केली. याचिकेची सुनावणी होऊन १८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने आदेश पारित करीत नकाशी ग्राम पंचायतचे सरपंच रवींद्र मुरुमकार यांना महाराष्टÑ अधिनियम, १९५९ चे कलम ३९ (१) (एक) अन्वये सरपंच ग्रामपंचायत नकाशी या पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले. याप्रकरणी याचिकाकर्ता विजय वायधन तायडे यांची बाजू अ‍ॅड. गोपाल मिश्रा, अ‍ॅड. पी. के. राहुडकर, अ‍ॅड. संतोष राहाटे यांनी मांडली. (वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोलाsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतHigh Courtउच्च न्यायालय