अकोला- श्री विष्णू तोष्णीवाल स्मृती टि-२0 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी पीएचसीए नागपूर आणि अमरावती संघांनी विजय मिळविला. अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात पीएचसीए नागपूर संघाने उज्जैन कोल्ट संघाचा ५३ धावांनी पराभव केला. अक्षय कोलारच्या ६ धावांच्या बळावर नागपूर संघाने ६ बाद १४२ धावा केल्यात. प्रत्युत्तरात उज्जैन संघ ८९ धावा काढून बाद झाला. नागपूर संघातर्फे अभिग्यान सिंगने ३ बळी घेतले. दुसर्या सामन्यात अमरावती संघाने बुलडाणा संघाचा ८ गडी राखून पराभव केला. बुलडाणा संघ १९.१ षटकात १३२ धावा काढून बाद झाला. प्रमोद वाघने सर्वाधिक ३९ धावा केल्यात, तुषार चाटेने २३ तर निखील कुळकर्णीने २0 धावांचे योगदान दिले. ऋषिकेश पवारने १९ धावा काढल्यात. अमरावती संघातर्फे राहुल गणोरकरने १२ धावांमध्ये ३ बळी घेतले. बुलडाणा संघाने ठेवलेले लक्ष्य अमरावतीने १६ व्या षटकात तिसर्या चेंडूवर गाठले. २ गडी गमावून १३३ धावा करणार्या अमरावतीतर्फे संदीप मोरने नाबाद ५८ तर आशिष सोळंकेने ४0 धावा केल्यात. सागर तांबोळी १३ धावा काढून नाबाद राहिला. बुलडाणा संघातर्फे मोईन शेख आणि शुभम पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. ,
टी-२0 क्रिकेट सामन्यात नागपूर, अमरावती संघाचा विजय
By admin | Updated: January 13, 2015 00:58 IST