अकोला: नायगावातील संजयनगरात छापा घालून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ५५0 ग्रॅम गांजा जप्त करून आरोपीस अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय जी.एस. गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी पथकासह संजयनगरातील घरात छापा घातला आणि शेख सत्तार शेख पक्कू (५0) याच्याकडून गांजा जप्त केला. ही कारवाई राजकुमार मिश्रा, राहुल तायडे, नितीन मगर, विजू बावस्कर, नंदू टिकार यांनी केली.
नायगावातून अर्धा किलो गांजा जप्त; आरोपी गजाआड
By admin | Updated: October 13, 2014 01:32 IST