शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड केंद्रावरील घोळाची चौकशी होणार!

By admin | Updated: May 20, 2017 01:15 IST

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. या गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले आहे. या वृत्ताची दखल घेत सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी १६ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना मुद्देनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तेल्हारा येथे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाने नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू केले. सुरुवातीपासूनच या केंद्रावर अनेक गैरप्रकार झाले आहेत. बोगस टोकन देऊन व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर मोजण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर मृत शेतकऱ्याच्या नावावर तूर विकल्याचा प्रताप बाजार समितीने केला आहे. पुरवणी टोकनच्या नावावर मोठ्या प्रमाणात बोगस टोकनचे वाटप बाजार समितीने केले. बाजार समितीच्या रेकॉर्डमध्ये अनेक ठिकाणी खोडाखोड करण्यात आली आहे, तसेच रेकॉर्डवर ८२ नग असताना १८२ करणे व पुरवणी टोकन देऊन मोजमाप केल्याचा प्रकारही या केंद्रावर घडला होता. संचालकांच्या नावाने रेकॉर्डला नगाची नोंद असून, वाहन क्रमांकच टाकलेले नाहीत. बाजार समितीचे सभापती यांच्या मुलीच्या नावाची बाजार समितीच्या रेकॉर्डवर नोंद आहे; मात्र नगाचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. तुदगाव येथील शेतकऱ्याच्या नावावर २२४ नगाची नोंद आहे; मात्र ते कोणत्या वाहनाने आणले, याचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. मनब्दा येथील शेतकरी संतोष जानराव पाथ्रीकर यांनी २६ फेब्रुवारी २०१७ रोजी १७२ नग तूर आणली होती. त्यांच्या १०८२ याच टोकनवरून १० शेतकऱ्यांना पुरवणी टोकन देण्याचा प्रताव बाजार समितीने केला आहे. विशेष म्हणजे, पुरवणी टोकन केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांनाच देता येते; परंतु पाथ्रीकर यांच्या नात्यात नसलेल्याही अनेकांना बाजार समितीने पुरवणी टोकनचे वाटप करून त्यांची तूर मोजली आहे. बाजार समितीतील या सर्व गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना तेल्हारा नाफेड केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा उपनिबंधक अकोला व जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनाही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार आहे.