शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डच्या प्राधान्य क्षेत्र कर्ज वितरण आराखड्यास मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:51 IST

जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची (डीएलसीसी) बैठक गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये ‘नाबार्ड’मार्फत सन २0१८-१९ साठी तयार करण्यात आलेल्या प्राधान्य क्षेत्र कर्ज वितरण आराखड्यावर चर्चा झाली. तसेच या समितीने १७९६ कोटी ५२ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्रदान केली. 

ठळक मुद्दे१७९६ कोटींचा आराखडासल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची (डीएलसीसी) बैठक गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये ‘नाबार्ड’मार्फत सन २0१८-१९ साठी तयार करण्यात आलेल्या प्राधान्य क्षेत्र कर्ज वितरण आराखड्यावर चर्चा झाली. तसेच या समितीने १७९६ कोटी ५२ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्रदान केली. याप्रसंगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एस.पी. सिंग, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रदीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्याम कडेकर यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.नाबार्डचे खंडरे यांनी सन २0१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता प्राधान्य क्षेत्रांमध्ये कर्जवाटप करण्यासाठी नाबार्डमार्फत तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली. त्यानुसार खरीप व रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपासाठी १,४३0 कोटी १८ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तसेच शेतीपूरक उपक्रम, अन्न प्रक्रिया, फळबाग लागवड, शिक्षण, घरकुल यासह इतर क्षेत्रांचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला. या आराखड्याविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतर समितीने सदर आराखड्याला मंजुरी दिली. याप्रसंगी जिल्हा स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) सह बँकांशी संबंधित इतर योजनांचा आढावा घेण्यात आला.