शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार विद्यार्थ्यांनी दिली सायन्स एक्स्प्रेसला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : देशापुढे पाणी आणि वायू प्रदूषणाची मोठी समस्या असल्याने आगामी पिढीला या प्रदूषणाची जाणीव व्हावी आणि त्यांनी प्रदूषणमुक्तीसाठी तत्पर असावे, असा संदेश घेऊन निघालेली सायन्स एक्स्प्रेस मूर्तिजापूरमध्ये दाखल झाली. एकदिवसीय प्रदर्शनामध्ये शहरातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी या एक्स्प्रेसला भेट दिली. या ट्रेनमध्ये असलेल्या सुमारे ३०० मॉडल्सच्या माध्यमातून ...

ठळक मुद्देमूर्तिजापुरात एक दिवस होता मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : देशापुढे पाणी आणि वायू प्रदूषणाची मोठी समस्या असल्याने आगामी पिढीला या प्रदूषणाची जाणीव व्हावी आणि त्यांनी प्रदूषणमुक्तीसाठी तत्पर असावे, असा संदेश घेऊन निघालेली सायन्स एक्स्प्रेस मूर्तिजापूरमध्ये दाखल झाली. एकदिवसीय प्रदर्शनामध्ये शहरातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी या एक्स्प्रेसला भेट दिली. या ट्रेनमध्ये असलेल्या सुमारे ३०० मॉडल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात आला.भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने सायन्स एक्स्प्रेस देशभर फिरून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करीत आहे. या ट्रेनने आतापर्यंत १ लाख ५६ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. मूर्तिजापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सायन्स एक्स्प्रेसने नागरिकांना पर्यावरण जागृतीचा संदेश दिला. गेल्या आठ वर्षांपासून विज्ञानाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये जागृती करणाºया या उपक्रमांतर्गत यंदा पाणी आणि वातावरणातील प्रदूषणावर जागृती मोहीम सुरू केली आहे.पाणी प्रदूषणामुळे जागतिक पातळीवर मोठा धोका निर्माण झाला असून, त्याबाबतचे उपाय आणि उपचार याविषयी १३ डब्यांच्या या एक्स्प्रेसमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. यापूर्वी या एक्स्प्रेसच्या माध्यमातून जैवविविधतेविषयी देशभर जागृती अभियान चालविले होते. आता पाणी आणि हवा प्रदूषणाची जनजागृती केली जात आहे.मान्यवरांनी दिली भेटसायन्स एक्स्प्रेसचे शहरात आगमन झाल्यानंतर खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार हरीश पिंपळे, नगराध्यक्ष मोनाली गावंडे, भाजपचे शहर अध्यक्ष भारत भगत, रावसाहेब कांबे, सभापती स्नेहा नाकट, रावसाहेब कांबे, सतीशचंद्र शर्मा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.मूर्तिजापूर येथे एकदिवसीय प्रदर्शनामध्ये ३० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे. १३ डब्यांच्या या प्रदर्शनात तरुण पिढीला जागृत करण्याची संकल्पना आहे. तरुणांकडून यास प्रतिसाद लाभत आहे.- रुबल बोरा,व्यवस्थापक, विज्ञान एक्स्प्रेस