लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : स्थानिक खडकपुरा भागातील एकाच समाजातील दोन गटांत ७ सप्टेंबरच्या रात्री ९.३0 वाज ताच्या सुमारास तुफान धुमश्चक्री झाली. या मारामारीत १२ जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या मारामारीमागील कारण समजू शकले नाही. तथापि, एकाच समाजाच्या दोन गटांतील या समाजातील १२ जण जखमी झाले असून, त्यामधील तीन जखमींना अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर जखमींना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन पडघण यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हे वृत्त लिहिपयर्ंत सुरू झाली नव्हती.
मूर्तिजापुरात दोन गटांत धुमश्चक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:39 IST
स्थानिक खडकपुरा भागातील एकाच समाजातील दोन गटांत ७ सप्टेंबरच्या रात्री ९.३0 वाज ताच्या सुमारास तुफान धुमश्चक्री झाली. या मारामारीत १२ जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मूर्तिजापुरात दोन गटांत धुमश्चक्री
ठळक मुद्दे१२ इसम जखमी खडकपुरा भागातील घटना