शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मनपा क्षेत्रातील शासकीय कर्मचार्‍यांना ‘एचआरए’चा तोटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:05 IST

अकोला महापालिका क्षेत्रातील केंद्र आणि राज्याच्या शासकीय कर्मचार्‍यांना, गत दहा महिन्यांपासून घरभाडे भत्यात दहा टक्क्यांचा तोटा सहन करावा लागत असून, यापासून अनेक जण अजूनही अनभिज्ञ आहेत. वित्त मंत्रालयाच्या ‘वाय’ वर्गीकरणात पात्र असूनही अकोला महापालिका क्षेत्रातील शासकीय कर्मचार्‍यांना कनिष्ठ असलेल्या ‘झेड’ श्रेणीतील वर्गाचेच घरभाडे मिळत असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देअकोला ‘वाय’ वर्गीकरणात असून, दिले जातेय ‘झेड’ वर्गीकरणाचे घरभाडे!

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला महापालिका क्षेत्रातील केंद्र आणि राज्याच्या शासकीय कर्मचार्‍यांना, गत दहा महिन्यांपासून घरभाडे भत्यात दहा टक्क्यांचा तोटा सहन करावा लागत असून, यापासून अनेक जण अजूनही अनभिज्ञ आहेत. वित्त मंत्रालयाच्या ‘वाय’ वर्गीकरणात पात्र असूनही अकोला महापालिका क्षेत्रातील शासकीय कर्मचार्‍यांना कनिष्ठ असलेल्या ‘झेड’ श्रेणीतील वर्गाचेच घरभाडे मिळत असल्याची बाब समोर आली आहे.अकोला महापालिकेच्या विस्तारात  शहरालगतच्या अनेक  ग्रामपंचायती जोडल्या गेल्यात. त्यामुळे अकोला महापालिकेची लोकसंख्या आता पाच लाखांच्या पलीकडे पोहोचली. ज्या महानगराचा, महापालिकांचा विस्तार पाच लाखांच्या वर आहे अशा ठिकाणच्या केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांना ‘वाय’ श्रेणीतील वर्गवारीप्रमाणे २0 टक्के घरभाडे देण्यात यावे, असे निर्देश भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे आहेत. भारत सरकारचे अवर सचिव अनिल शर्मा यांच्या स्वाक्षरीचे अध्यादेश देशभरात लागू आहे. महानगराच्या पुनर्वर्गीकरणाच्या  जनगणनेचे निकष यासाठी लावले गेले आहे. राष्ट्रपतींनीदेखील यास मंजुरी दिली असून, उत्तर प्रदेशमधील सहारनपूर महापालिका क्षेत्रातील शासकीय कर्मचार्‍यांना, सर्वप्रथम त्याचा लाभ मिळाला आहे. १ जून ११ पासून या नियमांची अंमलबजावणी करीत देशभरातील शासकीय कर्मचार्‍यांना २0 टक्के घरभाडे दिले जात आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालय विभागाच्या वर्गवारीचे अनुकरण राज्य शासन करीत आल्याचे चित्र संपूर्ण देशातील आहे; मात्र अकोला महापालिका क्षेत्रातील केंद्रासह राज्याच्या कर्मचार्‍यांना त्याचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. अकोला महापालिकेचा विस्तार होऊन दहा महिन्यांचा कालावधी झाला. शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत झाला. पाच लाख लोकसंख्येच्या पार गेलेल्या अकोला महापालिकेला मात्र अजूनही पाहिजे त्या सुविधा मिळालेल्या नाहीत. अकोला जिल्हय़ातील हजारो केंद्रीय आणि हजारो राज्य शासनाचे कर्मचारी घरभाडे भत्त्यापासून वंचित आहेत.

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने २00१ च्या जनगणनेनुसार पुनर्वर्गीकरणाची वर्गवारी श्रेणी जाहीर केली आहे. त्यात ५0 लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या ‘एक्स’ श्रेणीच्या महानगरासाठी ३0 टक्के, ५ लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या ‘वाय’ श्रेणीतील महानगरासाठी २0 टक्के आणि पाच लाखांच्या आत लोकसंख्या असलेल्या झेड श्रेणीतील ठिकाणच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना १0 टक्के घरभाडे भत्ता देण्याचे निर्देश आहेत.-