शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या शिक्षणाधिकार्‍यांना हवी नागपूरला बदली.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:30 IST

महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार पूर्णत: ढेपाळल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळांमध्ये मूलभूत सुविधांची दाणादाण उडाली असून, शैक्षणिक कामकाजात सुधारणा करण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांना नागपूर येथे बदली हवी असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी केला आहे.

ठळक मुद्देशिवसेना गटनेत्यांचा गौप्यस्फोटकामकाज ढेपाळल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार पूर्णत: ढेपाळल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळांमध्ये मूलभूत सुविधांची दाणादाण उडाली असून, शैक्षणिक कामकाजात सुधारणा करण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांना नागपूर येथे बदली हवी असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी केला आहे. प्रशासनाने शिक्षणाधिकार्‍यांना तातडीने नागपूरला रवाना करणे गरजेचे असल्याचे मत राजेश मिश्रा यांनी स्थायी समितीच्या सभेत व्यक्त केले. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळेच तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या कार्यकाळात मनपा शाळांचे समायोजन करण्यात आले. त्यावेळी मनपाच्या ५४ शाळा होत्या. त्यांची संख्या आता ३३ वर आली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वर्ग खोल्यांमध्ये पंखे, स्वच्छतागृहांचा अभाव आहे. अशा स्थितीत प्रशासनाने ४४ लाख रुपयांमधून डिजिटल स्कूल संकल्पने अंतर्गत ई-लर्निंग साहित्य खरेदीचा निर्णय घेतला. हा विषय स्थायी समितीच्या सभेत पटलावर आला असता, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, भाजपाचे नगरसेवक अजय शर्मा, राष्ट्रवादीचे नगरसेवक फैयाज खान यांनी शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांच्या कारभारावर असंख्य प्रश्न उपस्थित केले. शिक्षणाधिकार्‍यांनी मनपा शाळांची नियमित तपासणी करणे अपेक्षित असून, मूलभूत सुविधा पुरविणे नैतिक जबाबदारी आहे. शिक्षकांच्या अंतर्गत वादामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकार्‍यांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याचा आरोप नगरसेवक फैयाज खान यांनी केला. 

जबाबदारी निश्‍चित का नाही?दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यावरही मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना अद्यापही पुस्तके मिळाली नाहीत. यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकार्‍यांची आहे. शिक्षण विभागाचे कामचुकार धोरण विद्यार्थ्यांंच्या भविष्यावर उठले आहे. या सर्व बाबी पाहता शिक्षणाधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित का होत नाही, त्यांना प्रशासन सातत्याने पाठीशी का घालते, असा सवाल नगरसेवक अजय शर्मा यांनी उपस्थित केला.

सुधारणा करा, अन्यथा..सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिक्षणाधिकार्‍यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. शिक्षण विभागाचा ढेपाळलेला कारभार ध्यानात घेता शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी कामकाजात सुधारणा करावी; अन्यथा त्यांचा पदभार काढावा लागेल, अशा शब्दात स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी शिक्षणाधिकार्‍यांना सुनावले. -