शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून महापालिकेचे कामकाज ‘बंद’

By admin | Updated: January 23, 2015 02:15 IST

अकोला मनपा कर्मचारी संघर्ष समितीचा शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय.

अकोला: सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांचे वेतन व पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने गुरुवारी पुन्हा आंदोलनाचा बिगुल फुंकला. समितीने शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मनपातील सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांचे सहा महिन्यांचे वेतन थकीत असून, जुलै महिन्याची पगारवाढ डिसेंबर महिन्यात लागू केली. पाचव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम, सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा करण्यात आली नाही. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मनपा कर्मचारी संघर्ष समितीने डिसेंबर महिन्यात प्रशासनाला आंदोलनाची रीतसर नोटीस दिली. शिवाय मनपा आवारात टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडल्यानंतरही प्रशासनाने चर्चा न केल्याने कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे २३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय संघर्ष समितीच्यावतीने अध्यक्ष पी.बी. भातकुले, उपाध्यक्ष अनुप खरारे, शांताराम निंधाने, कैलास पुंडे, अनिल बिडवे, विठ्ठल देवकते, विजय पारतवार, विजय सारवान, प्रताप झांझोटे, गुरू सारवान यांनी घेतला आहे. मनपा कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी.भातकुले यांनी मनपाच्या तिजोरीत ११ कोटी पडून आहेत. तरीही वेतन दिले जात नसल्यबद्दल रोष व्यक्त केला. कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असताना प्रशासकीय अधिकारी सत्काराची हौस भागवतात, हे दुर्दैवी आहे. संघर्ष समितीसोबत वरिष्ठ अधिकारी व पदाधिकार्‍यांनी कधीही चर्चा केली नाही. यामुळे नाईलाजाने संपावर जावे लागत आहे. अधिकारी मनमानी करीत असून, अंदाधुंद कारभार सुरू आहे. सेवानवृत्त कर्मचार्‍यांची परिस्थिती फार दयनीय आहे. उद्यापासून काम बंद आंदोलन सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*कामकाज कोलमडणार

मनपा कर्मचारी संघर्ष समितीने बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने उद्यापासून मनपाचे प्रशासकीय कामकाज ठप्प पडणार आहे. याचा परिणाम मूलभूत सुविधांवर होईल, हे निश्‍चित आहे. आंदोलनात सेवानवृत्त कर्मचारीसुद्धा सहभागी होणार आहेत.

*शिक्षकही लागले तयारीला

मनपा शिक्षकांचेदेखील सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. आयुक्त रुजू झाल्यानंतर वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने शिक्षकांनी आंदोलन स्थगित केले होते. आयुक्तांच्या बदलीमुळे आता शिक्षकदेखील आंदोलनाच्या तयारीत आहेत. -