शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वास्तुविशारदांच्या निवड प्रक्रियेकडे महापालिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:28 IST

महापालिकांनी वास्तुविशारदांची नियुक्ती केली नसल्याचे चित्र आहे.

अकोला: महापालिका क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या प्रशासकीय इमारतींचे निर्माण करण्यासाठी कुशल आणि सक्षम वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता वास्तुकला परिषदेच्या (कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली) सूचना व अटीनुसार अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. या निर्देशांकडे महापालिकांनी पाठ फिरवल्याचे समोर आले असून, वास्तुविशारदांची नियुक्ती केली नसल्याचे चित्र आहे. यामुळे ‘ड’ वर्ग महापालिका क्षेत्रात प्रस्तावित नवीन इमारतींचा आराखडा रखडल्याची परिस्थिती आहे.स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालयांच्या इमारतींचे निर्माण किंवा नूतनीकरणासाठी कुशल वास्तुविशारदांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. जिल्हा प्रशासन असो वा महापालिकेच्या नगररचना विभागासाठीसुद्धा वास्तुविशारदांच्या नियुक्तीची गरज आहे. दरम्यान, शहरांचा होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आदी बाबी लक्षात घेता स्वायत्त संस्थांच्यावतीने त्यांच्या मालकीच्या आरक्षित जागांवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याची कामे प्रस्तावित आहेत. त्यानुषंगाने वास्तुविशारदांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. भविष्यातील सर्व बाजूंचा विचार करून नवीन प्रशासकीय इमारतींचे बांधकाम व्हावे या उद्देशातून नगर विकास विभागाने वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यासाठी वास्तुकला परिषदेच्या (कौन्सिल आॅफ इंडिया, नवी दिल्ली) वास्तुविशारद अधिनियम १९७२ अन्वये अंमलबजावणी करण्याचे निर्देश जारी केले होते. महापालिकांनी निविदा प्रक्रिया न राबवता वास्तुविशारदांची निवड ही वास्तुकला संकल्पना स्पर्धेद्वारे करण्याचा समावेश होता. शासनाच्या संकल्पनेकडे महापालिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे....म्हणून रखडली प्रक्रिया!वास्तुकला संकल्पना स्पर्धेद्वारे वास्तुविशारदांची निवड करण्यात महापालिका व सत्ताधाऱ्यांना अजिबात ‘इन्टरेस्ट’नाही. या निवडीमुळे अनेकांच्या टक्केवारीवर गंडांतर येणार असल्यामुळेच ही निवड प्रक्रिया रखडल्याची माहिती आहे.मनपाला राबवावी लागेल प्रक्रियाअकोला महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसोबतच शहरातील तीन आरक्षित जागांवर कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारले जाईल. यासाठी महापौर विजय अग्रवाल शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. याकरिता प्रशासनाला वास्तुविशारदांच्या निवडीसाठी निविदा प्रक्रिया न राबवता स्पर्धा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका