शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळांचे शासनाकडे कोट्यवधींचे अनुदान थकीत

By admin | Updated: June 3, 2017 01:31 IST

प्रस्ताव तयार करा; महापौरांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या शाळा इमारत भाडे अनुदानापोटी शासनाकडे एक-दोन नव्हे तर तब्बल आठ ते दहा कोटींचे अनुदान रखडल्याची बाब महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महापौरांनी दिल्यानंतर निष्क्रिय असलेला शिक्षण विभाग सरसावला आहे.महापालिकेच्या शाळा इमारतींच्या भाडेअनुदानापोटी शासनामार्फत अनुदान प्राप्त होते. त्यासाठी मनपा शाळांच्या इमारतींचे तसेच खुल्या मैदानाचे दर चार किंवा पाच वर्षांनी मोजमाप होणे अपेक्षित आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असली तरी मुजोर झालेल्या शिक्षण विभागाने मागील दहा वर्षांपासून एकही अहवाल तयार केला नसल्याची माहिती आहे. परिणामी इमारतींच्या अनुदानापोटी शासनाकडे कोट्यवधींचे अनुदान रखडल्याची परिस्थिती आहे. एकीकडे शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी निधीची बोंब मारणाऱ्या शिक्षण विभागाने आजपर्यंत इमारतींच्या अनुदानाचा प्रस्ताव का तयार केला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही बाब महापौर विजय अग्रवाल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उपायुक्त समाधान सोळंके यांना तातडीने अनुदानासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. उपायुक्तांनी शाळांचे मोजमाप करून त्याचे रेडीरेकनरचे दर निश्चित करण्याची जबाबदारी बांधकाम विभागावर सोपवली असून, शहर अभियंता इक्बाल खान व त्यांची चमू कामाला लागली आहे. ३४ शाळांपैकी २२ शाळा इमारतींचे मोजमाप पूर्ण झाल्याची माहिती आहे. २००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या कालावधीत रेडीरेकनरचे दर लक्षात घेता अनुदानाची रक्कम किमान ८ ते १० कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्नमनपाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना राहण्यासाठी मनपाचे निवासस्थान देण्याची कोणतीही तरतूद नाही. निवासस्थान रिकामे असेल तर तात्पुरत्या काळासाठी स्थानिक अधिकारी त्याचा वापर करू शकतात. शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना मागील अनेक वर्षांपासून मनपाच्या निवासस्थानात मुक्कामी आहेत. मध्यंतरी प्रशासनाने त्यांना निवासस्थान सोडण्याची नोटीस जारी केली होती. सभागृहात सभेला त्या अनेकदा अनुपस्थित असतात. असे असताना प्रशासनातील काही अधिकारी त्यांची पाठराखण करीत असल्याची बाब महापौरांच्या निदर्शनास आली आहे.शिक्षण विभागाचा वाली कोण?शाळा इमारतींच्या अनुदानाची रक्कम प्राप्त करण्यासाठी दर दहा वर्षांनी इमारतींचे मोजमाप करून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची तरतूद असल्याचा दावा प्रशासनाकडून होतो. १९९७ ते २००७ पर्यंतच्या कालावधीत मनपाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार शासनाने २ कोटी ६८ लक्ष मंजूर केले होते. त्यापैकी १ कोटी ६७ लक्षची रक्कम अद्यापही रखडली आहे.दहा वर्षांनी नव्हे तर दर चार किंवा पाच वर्षांनी शिक्षण विभागाने इमारतींच्या अनुदानाचा प्रस्ताव तयार करणे अपेक्षित आहे. शिक्षण विभागाचा कारभार चालविण्याची संबंधित अधिकाऱ्यांमध्ये कुवत नाही. प्राप्त अनुदानातून शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तरतूद केली जाईल.- विजय अग्रवाल, महापौर