शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने खरेदी केल्या २५ ई-कचरा घंटागाडी, कार्यादेश जारी; इंधन खर्चात होणार कपात

By आशीष गावंडे | Updated: December 28, 2023 20:37 IST

या वाहनांमुळे महापालिकेच्या इंधन खर्चात मोठी कपात होणार आहे.

अकोला: 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा तसेच शहरातील प्रदूषण कमी व्हावे,  या उद्देशातून महापालिका प्रशासनाने २५ ई-कचरा घंटागाडी खरेदी केल्या आहेत. या संदर्भात श्रीनिवास व्हेईकल इंडिया एजन्सीला 'वर्क ऑर्डर' दिली आहे. या वाहनांमुळे महापालिकेच्या इंधन खर्चात मोठी कपात होणार आहे.

'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत केंद्र शासनामार्फत तसेच महापालिकेला दिल्या जाणाऱ्या १५ व्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी यापुढे कचरा संकलनासाठी  इंधनावर धावणाऱ्या वाहनांऐवजी  ई - वाहनांचा वापर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत. वर्तमानस्थितीत शहरात इंधनावर धावणाऱ्या घंटागाडीमुळे प्रदूषणाला हातभार लागत आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाकडून चार्जिंगवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. अशी वाहने खरेदी करण्यासाठी महापालिकेला निधी दिला जात आहे. स्वच्छ भारत अभियान तसेच १५ व्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी दिल्या जाणाऱ्या निधीतून टप्प्याटप्प्याने ई-कचरा घंटागाडी खरेदी करण्यासाठी मनपा प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात निविदा प्रसिद्ध केली होती. यामध्ये मनपाकडे चार निविदा अर्ज प्राप्त झाले असता यापैकी कमी दर असलेल्या श्रीनिवास व्हेईकल इंडिया एजन्सीची निविदा मंजूर करण्यात आली असून एजन्सीला कार्यादेश दिले आहेत.  या एजन्सी कडून ५०० किलो क्षमतेपेक्षा अधिक कचरा वाहून नेण्याची क्षमता असणारे प्रती वाहन १२ लाख ५० हजार रुपये नुसार २५ वाहनांची खरेदी करण्यास महापालिका तयार झाली आहे. वाहन चार्ज केल्यावर १४० किलोमीटर अंतर धावणारमनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात २५ ई- वाहनांची खरेदी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २० वाहनांची खरेदी केल्या जाणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर सदर वाहन १४० किलोमीटर पेक्षा अधिक अंतर धावणार आहे. याकरिता शहरात दक्षिण झोनमध्ये उभारण्यात आलेल्या ट्रान्सफर स्टेशनमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. इंधन खर्चात होणार बचतमहापालिका क्षेत्रात कचरा संकलन करण्यासाठी १२१ वाहने आहेत. यापैकी २६ वाहने नादुरुस्त असल्याची माहिती आहे. दरम्यान, या संपूर्ण वाहनांच्या इंधनापोटी महापालिकेला महिन्याकाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. ई-वाहनांमुळे महापालिकेच्या इंधन खर्चात मोठी बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. 

टॅग्स :Akolaअकोला