शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

मनपा आवारात कचरा टाकणे पडणार महागात

By admin | Updated: June 18, 2014 00:59 IST

राष्ट्रवादीचे आंदोलन; प्रशासन पोलिस तक्रार करण्याच्या तयारीत

अकोला : शहरात सर्वत्र पसरलेली घाण व अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या मुद्यावर मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर कचरा टाकण्यात आला. हा कचरा टाकणे राष्ट्रवादीला महागात पडण्याची शक्यता असून, याप्रकरणी पोलिस तक्रार करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्याची माहिती आहे.महापालिकेचे नियोजन पुरते ढेपाळले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराच्या कानाकोपर्‍यात घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रशासनाच्या निषेधार्थ आयुक्तांच्या कार्यालयासमोर कचरा टाक ण्यात आला. निवेदन घेण्यासाठी आयुक्त उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात नारेबाजी केली. प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे हजर नसल्यामुळे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती पप्पू शर्मा, नितीन झापर्डे, बुढन गाडेकर, संदीप बाथो, देवानंद राऊत, युवराज फोकमारे, गोविंद पांडे, अमोल अवचार, मंगेश चोपडे, सचिन पाटील, आशीष शिरसाट, अश्विन दाते,पवन भिरड, राहुल कोरपे, मुन्ना पांडे, जगदीश देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.**  पोलिस तक्रार होणार?मनपा आवारात आंदोलन करून घाण व कचरा टाकणार्‍या राकाँच्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. एकीकडे पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश द्यायचे अन् दुसरीकडे राकाँच्या काही पदाधिकार्‍यांना बुधवारी सकाळी चर्चेसाठी बोलवायचे,अशी विचित्र भूमिका प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे.