शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फोर-जी केबलच्या तपासणीसाठी मनपाकडे यंत्रणाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:28 IST

कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारेच मनपाच्या बांधकाम विभागाकडे ‘डेटा’ उपलब्ध असल्याची केविलवाणी परिस्थिती आहे.

अकोला: मोबाइल कंपन्यांनी गत दोन वर्षांच्या कालावधीत शहरात नेमके किती किलोमीटर अंतराचे फोर-जी केबलचे जाळे टाकले, याची उलट तपासणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सक्षम यंत्रणाच उपलब्ध नसल्याची माहिती आहे. अर्थात, शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी फोर-जी केबल टाकणारी स्टरलाइट टेक कंपनी असो वा इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारेच मनपाच्या बांधकाम विभागाकडे ‘डेटा’ उपलब्ध असल्याची केविलवाणी परिस्थिती आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासनाकडून अकोलेकरांची दिशाभूल केली जात असल्याची खमंग चर्चा शहरात रंगली आहे.फोर-जी सेवा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली अनेक मोबाइल कंपन्यांकडून शहरात गत दोन वर्षांपासून केबलचे जाळे टाकल्या जात आहे. शहरात खोदकाम करून केबल टाकण्यासाठी संबंधित कंपन्यांनी मनपाकडे प्रस्ताव सादर करणे भाग होते. तसे न करताच कंपन्यांनी खोदकामाचा सपाटा लावला. विनापरवानगी खोदकाम करणाºया कंपन्यांवर महापालिके च्या बांधकाम विभागात प्रामाणिकतेचा आव आणणाºया अधिकाºयांनी कधीही कारवाई केल्याचे ऐकिवात नसल्यामुळे संबंधित अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांची भूमिका संशयाच्या भोवºयात सापडली आहे. यादरम्यान, प्रशासनाकडे शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी फोर-जी केबल टाकण्याकरिता स्टरलाइट टेक कंपनीने प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला मनपाच्या ९ डिसेंबर २०१९ च्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट होते. कंपनीला महापालिकेने सिंगल केबल टाकण्याची परवानगी दिली असली तरी संबंधित कंपनीकडून दोन पाइपद्वारे दोन वेगवेगळ्या केबल टाकल्या जात असल्याची तक्रार सत्तापक्ष भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाकडे क रताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानुषंगाने मनपाने कंपनीला काम बंद करून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीकडून सिंगल केबल टाकल्या जात असल्याचा दावा केला जात असतानाच मनपाच्या बांधकाम विभागाकडे या दाव्याची खातरजमा करण्यासाठी सक्षम यंत्रणाच उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे कंपनी कोणतीही असो, त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बांधकाम विभागातील प्रामाणिक अधिकारी घोडे नाचविण्यात मश्गूल असल्याचे चित्र आहे.त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी का नाही?गत दोन वर्षांपासून शहरात फोर-जी केबल टाकणाºया विविध मोबाइल कंपन्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी बांधकाम विभागाने नियंत्रण अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंत्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या का, असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकरणात बांधकाम विभागाची संशयास्पद भूमिका पाहता त्रयस्थ एजन्सीमार्फत केबलच्या खोदकामाची चौकशी करण्याची गरज आहे.

माहिती लपविण्याचा प्रयत्न का?शहरात गत दोन वर्षांपासून विविध मोबाइल कंपन्यांकडून फोर-जी केबलसाठी सुमारे ४० किलोमीटरपेक्षा अधिक खोदकाम करण्यात आल्याची माहिती आहे. या बदल्यात मनपाला ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक चुना लागल्याचे बोलल्या जात आहे. गत दोन वर्षांत शहरात किती कंपन्यांनी खोदकाम केले, याबद्दल बांधकाम विभागाने माहिती देणे अपेक्षित असताना ती लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे.नियंत्रण अधिकारी होते कोठे?मनपाने स्टरलाइट टेक कंपनीच्या खोदकामावर देखरेख ठेवण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त्या केल्या होत्या. खोदकामादरम्यान मनपाचे नियंत्रण अधिकारी प्रत्यक्षात हजर नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कंपन्यांनी किती केबल टाकल्या, याबद्दल अविश्वासाचे वातावरण कायम आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका