शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला कामचुकार कर्मचाऱ्यांची गरज नाही - मनपा आयुक्तांचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:12 IST

अकोला: मनपाचा प्रशासकीय डोलारा विस्कळीत असताना सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल तर महापालिकेला अशा कामचुकार कर्मचाºयांची गरज नसल्याचे सांगत सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन कंत्राटी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविला.

अकोला: मनपाचा प्रशासकीय डोलारा विस्कळीत असताना सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल तर महापालिकेला अशा कामचुकार कर्मचाºयांची गरज नसल्याचे सांगत सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन कंत्राटी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविला, तसेच अशा कामचुकार, निष्क्रिय कर्मचाºयांचा शोध घेऊन त्यांची यादी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी आढावा बैठकीत विभाग प्रमुखांना दिले. आयुक्तांच्या रोखठोक भूमिकेमुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासकीय कामकाजाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत कामचुकार कर्मचाºयांची हयगय करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याची चुणूक मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. प्रशासकीय कामकाजात हलगर्जी व कर्तव्यापासून पळ काढणाºया कंत्राटी कर्मचाºयांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आल्याचे चित्र आहे. यासोबतच बांधकाम विभाग, नगररचना विभाग, अतिक्रमण विभागात एकसूत्री कारभारासाठी कर्मचाºयांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. सोमवारी मनपात दाखल झालेल्या आयुक्त संजय कापडणीस यांनी सकाळी १०.३० वाजता विविध विभागात जाऊन कर्मचाºयांची हजेरी घेतली. त्यावेळी तपासणीदरम्यान ५२ कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित आढळून आले. संबंधित कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.तीन क र्मचाºयांची सेवा बंदमनपाच्या नगररचना विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत दोन कनिष्ठ अभियंता व एक कंत्राटी आरोग्य निरीक्षक यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला. तसे निर्देश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले....तर अशा कर्मचाºयांचा शोध घ्या!शहर आपले आहे, या भावनेतून मनपात सेवा बजावा, सेवा देण्याच्या बदल्यात तुम्हाला महापालिका वेतन अदा करते, याचे भान ठेवा, जे कर्मचारी कर्तव्यापासून पळ काढतील, अशा कामचुकार व निष्क्रिय कर्मचाºयांचा शोध घेऊन त्यांची यादी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करा, अशा कर्मचाºयांची मनपाला गरज नसल्याचा खणखणीत इशारा आयुक्त संजय कापडणीस यांनी विभाग प्रमुखांना दिला. 

शासनाचे अधिकारी वगळल्यास मनपा कर्मचाºयांचे वेतन अकोलेकरांकडून प्राप्त कर स्वरूपातील रकमेतून होते, याचे भान कर्मचाºयांची ठेवण्याची गरज आहे. प्रामाणिकपणे सेवा देण्याची तयारी नसेल, तर कर्मचाºयांनी घराचा मार्ग पत्करावा, यापुढेसुद्धा कर्तव्यात कसूर करणाºयांची हकालपट्टी सुरूच राहील.-संजय कापडणीस आयुक्त मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका