शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्यालगतच्या अतिक्रमणावर मनपाकडून कारवाईचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:18 IST

काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण हटविण्याचा सपाटा लावल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देमुख्य बाजारपेठ व परिसराला लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. अतिक्रमकांच्या वाढत्या संख्येचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे.मुख्य रस्त्यालगत थाटलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाच्या वाढत्या समस्येमुळे अकोलेकरांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. वैतागलेल्या अकोलेकरांची समस्या लक्षात घेता मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण हटविण्याचा सपाटा लावल्याचे चित्र दिसत आहे. अतिक्रमण विभाग प्रमुख अनिल बिडवे यांनी सोमवारी सिंधी कॅम्प, खदान ते कौलखेड चौक, तुकाराम चौक, अग्रसेन ते दुर्गा चौक मार्गालगत दुकानदारांनी बांधलेले पक्के ओटे, टिनाचे अतिक्रमित शेड, चायनिज खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर कारवाई करीत अतिक्रमकांना हुसकावून लावले.शहरातील मुख्य बाजारपेठ व परिसराला लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. मनपाच्या अतिक्र मण निर्मूलन पथकाचा धाक नसल्यामुळे फेरीवाले चक्क मुख्य रस्त्यांवर बाजार मांडत असल्याची परिस्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने रेडीमेड ड्रेस विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच फळ विके्रत्यांचा समावेश आहे. शहराची संपूर्ण बाजारपेठ गांधी रोड, टिळक रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावर स्थिरावली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कमर्शियल कॉम्पलेक्समधील दुकाने, प्रतिष्ठानांच्या नाकावर टिच्चून लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी रस्त्यांलगत दुकाने थाटली आहेत. अतिक्रमकांच्या वाढत्या संख्येचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. नागरिकांना रस्त्यावर धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनासह सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड तक्रारी होत आहेत. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणाचा सफाया करण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिले आहेत.त्यानुषंगाने सोमवारी शहराच्या चारही झोन अंतर्गत येणाºया मुख्य रस्त्यालगत थाटलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मनपाचे नगर सचिव तथा अतिक्रमण विभाग प्रमुख अनिल बिडवे, सहायक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, विठ्ठल देवकते, मुलसिंग चव्हाण, चंद्रशेखर इंगळे यांसह सुरक्षा रक्षकांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका