शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्त पुन्हा रस्त्यावर

By admin | Updated: July 20, 2016 01:32 IST

मनपा आयुक्तांनी दुर्गा चौक ते अग्रसेन चौक रस्त्याची केली पाहणी.

अकोला: शहरात सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त अजय लहाने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. दुर्गा चौक ते अग्रसेन चौकपर्यंत रस्त्याच्या कामाची पाहणी करीत आयुक्तांनी रस्त्याच्या कामात कोणतीही तडजोड स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करीत संबंधित कंत्राटदार व बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना सूचना केल्या.अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून २0१३ मध्ये महापालिकेला १५ कोटींचा निधी दिला होता. या निधीतून प्रशासनाने डांबराचे १२ तसेच सिमेंट काँक्रिटच्या आठ रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. जुने शहरातील कॅनॉल रोड वगळता इतर डाबरी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे ह्यआरआरसीह्ण कंपनीला देण्यात आली असून नोव्हेंबर २0१५ मध्ये मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सुमारे ३८ फूट रुंद रस्त्याचे काम निकषानुसार व्हावे, यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दर दोन दिवसाआड रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याचा सपाटा लावला होता. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आयुक्तांच्या पाहणीचे फलित समोर आले. यादरम्यान, माळीपुरा ते मोहता मिलपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून मागील काही दिवसांपासून दुर्गा चौक ते अग्रसेन चौकपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. आयुक्त लहाने यांनी मंगळवारी अचानक दुर्गा चौक रस्त्याच्या कामाची पाहणी केली. बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णा वाडेकर व राजराजेश्‍वर क न्स्ट्रक्शन कंपनीच्या अभियंत्यांसोबत चर्चा करून रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल सूचना केल्या.