शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे पुन्हा स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:49 IST

अकोला : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा समारोप होण्याच्या  दुसर्‍याच दिवशी शहरात घाण व कचर्‍याचे ढीग साचल्याचे  सचित्र वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्याची दखल घेऊन महा पालिका आयुक्त अजय लहाने यांनी पुन्हा एकदा संपूर्ण शहरात  स्वच्छता अभियान राबवण्याचे निर्देश जारी केले आहेत.  प्रभागांमध्ये आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचार्‍यांना सामूहिकरी त्या सकाळी १0.३0 ते दुपारी २ वाजेपर्यंत दररोज स्वच्छता  अभियान राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देसकाळी १0.३0 ते दुपारी २ पर्यंत अभियान राबवण्याचे  आयुक्तांचे निर्देश

अकोला : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा समारोप होण्याच्या  दुसर्‍याच दिवशी शहरात घाण व कचर्‍याचे ढीग साचल्याचे  सचित्र वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्याची दखल घेऊन महा पालिका आयुक्त अजय लहाने यांनी पुन्हा एकदा संपूर्ण शहरात  स्वच्छता अभियान राबवण्याचे निर्देश जारी केले आहेत.  प्रभागांमध्ये आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचार्‍यांना सामूहिकरी त्या सकाळी १0.३0 ते दुपारी २ वाजेपर्यंत दररोज स्वच्छता  अभियान राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिसरातील अस्वच्छता, साफसफाईअभावी नागरिकांच्या  आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात या समस्येत  अधिकच भर पडते. ही बाब ध्यानात घेऊन शासनाने १५ स प्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’  अभियान राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने महापालिका  प्रशासनाने चारही झोनमध्ये सार्वजनिक जागा, खुली मैदाने, मन पा शाळांचा परिसर आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले.  अभियानात सर्वपक्षीय राजकीय नेते, महापालिका पदाधिकारी,  नगरसेवकांसह प्रशासकीय अधिकार्‍यांनी मोठय़ा उत्साहात  सहभाग घेतला. अभियानाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना  स्वच्छतेचे महत्त्व समजले, यात दुमत नाही. २ ऑक्टोबर रोजी अभियानाचा समारोप झाल्यानंतर काही  कामचुकार आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचार्‍यांमुळे शहरात  घाण व कचर्‍याचे ढीग साचून असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकम त’ने प्रकाशित केले. अर्थातच, ही मोहीम ठरावीक  कालावधीच्या अभियानापुरती सीमित नसल्याचे प्रशासनाच्या  निदर्शनास आले. त्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने  यांनी पुन्हा एकदा शहरात प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान सुरू  करण्याचे निर्देश बुधवारी जारी केले आहेत. 

आरोग्य निरीक्षकांवर जबाबदारीमनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागात कार्यरत सर्व आरोग्य  निरीक्षकांना सकाळी १0.३0 ते दुपारी २ वाजेपर्यंत दररोज त्या- त्या प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात  आले आहेत. संबंधित प्रभागांमध्ये कार्यरत सफाई कर्मचार्‍यांच्या  मदतीने लहान-मोठे नाले, सार्वजनिक जागा, रस्ते आदी  ठिकाणी दररोज स्वच्छतेच्या कामांना सुरुवात करावी लागणार  आहे. आयुक्तांच्या निर्देशांचे आरोग्य निरीक्षक व सफाई  कर्मचारी किती प्रामाणिकपणे पालन करतात, हे लवकरच दिसून  येणार आहे.