शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘बारुल्यात’ बुडाले मुगाचे पीक

By admin | Updated: August 3, 2016 01:50 IST

अकोला जिल्ह्यातील परिस्थिती; दुष्काळानंतर शेतकरी पुन्हा हवालदिल.

संतोष येलकर / अकोलासतत बरसणार्‍या पावसाचे पाणी शेतात साचल्याने, जिल्ह्यात खारपाणपट्टय़ातील बारुल्यात (१२ गावे) मुगाचे पीक करपले आहे. त्यामुळे या भागात मुगाचे उत्पादन बुडाल्याने दोन वर्षांच्या दुष्काळानंतर शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.गत दोन वर्षांच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पिकाचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस चांगला बरसत असला तरी, सतत पडणार्‍या पावसामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ात बारुला म्हणून ओळखल्या जाणार्‍या १२ गावांमधील शेतांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे बारुल्यात बहुतांश शेतांमध्ये पेरणीनंतर उगवलेल्या मुगाचे पीक करपले आहे. बारुल्यातील आपोती बु., आपोती खुर्द, आपातापा, घुसर, सांगळूद इत्यादी गावांमधील बहुतांश शेतांमध्ये उगवलेले पीक करपले असून, एकरी होणारे चार क्विंटल मुगाचे उत्पादन बुडाल्याचे वास्तव आहे. अशीच परिस्थिती या भागातील अनकवाडी, आखतवाडा, हुजरे मोहम्मदपूर, घुसरवाडी, म्हातोडी, दोनवाडा व लाखोंडा या गावांमध्येही असल्याचे चित्र आहे. गत दोन वर्षांमध्ये दुष्काळी परिस्थितीत पिके बुडाली होती. त्यानंतर यावर्षी चांगला पाऊस बरसत असला तरी, सतत बरसणार्‍या पावसामुळे पावसाचे पाणी शेतात साचत असल्याने, मुगाचे पीक बुडाले आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर या भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.कर्ज काढून पेरणी केली; पण पीक बुडाले!दोन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यावर्षी चांगला पाऊस बरसत असल्याने, पीक चांगले होणार असल्याची अपेक्षा होती; परंतु सतत पाऊस बरसत असल्याने शेतात साचणार्‍या पाण्यामुळे मुगाचे पीक करपले. पीक कर्ज काढून पेरणी केली; मात्र मुगाचे पीक करपल्याने पिकाचे उत्पादन बुडाले. पेरणीसाठी केलेल्या खर्चाएवढेही मुगाचे उत्पादन होणे कठीण आहे, असे या भागातील संबंधित शेतकर्‍यांनी सांगितले.सोयाबीन पिकाचेही नुकसान!बारुला भागात अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीन पीकही करपले आहे, तसेच काही शेतांमध्ये सोयाबीनचे पीक पिवळे पडले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचेही नुकसान होत असल्याचे चित्र आहे. ह्ययाह्ण गावांमध्ये करपले मुगाचे पीक!बारुल्यातील आपोती बु., आपोती खुर्द, आपातापा, घुसर, सांगळूद, आखतवाडा, अनकवाडी, एकलारा, घुसरवाडी, म्हातोडी, हुजरे मोहम्मदपूर व दोनवाडा इत्यादी गावांच्या शिवारातील मुगाचे पीक करपले आहे.