शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूर शिवनेरी सेवेच्या प्रवासभाड्यात कपात

By admin | Updated: December 29, 2014 23:51 IST

५७0 रूपयांची भरघोस कपात : रापमचे उपाध्यक्ष खंदारे यांची माहिती.

अकोला : राज्य परिवहन महामंडळाने मुंबई-नागपूर-मुंबई दरम्यान र्मयादित कालावधीकरीता सुरू केलेल्या शिवनेरी बससेवेच्या प्रवासभाड्यात कपात केली आहे. नाताळानिमित्त सर्वत्र सुट्टय़ा लागलेल्या असाताना, प्रवासात असणार्‍या किंवा प्रवासाला निघणार्‍या प्रवाशांना या दरकपातीचा लाभ घेता येणार आहे.महाराष्ट्र विधीमंडळ अधिवशेन दरम्यान नागपूरला जाणार्‍या प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने ६ डिसेंबर ते ५ जानेवारी या र्मयादित कालावधीकरीता शिवनेरी बससेवा सुरू केली. राज्य परिवहन महामंडळाने नुकतीच शिवनेरीच्या प्रवासभाड्यात कपात केली असून, नागपूर-मुंबई या ९00 कि.मी. अंतरासाठी शिवनेरीने प्रवास करणार्‍या प्रवाश्यास आधी २३७0 रूपये मोजावे लागत होते. कपातीनंतर आता १८00 रूपयेच मोजावे लागणार आहेत. प्रवाशांनी केलेल्या मागणीवरून ५७0 रूपये ही भरघोस कपात करण्यात आली असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. संकेतस्थळावर आणि मार्गात लागणार्‍या सर्व प्रमुख बस स्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर या सेवेचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.सद्या सर्वत्र नाताळाच्या सुट्टय़ा सुरू असल्याने राजधानी आणि उपराजधानी यांना जोडणार्‍या या सेवेमुळे मुंबई आणि नागपुरसह अमरावती, अकोला, औरंगाबाद, अहमदनगर व मार्गातील इतर प्रमुख शहरातील जनतेला या दरकपातीचा अधिक लाभ मिळणार आहे. ६ ते ५ जानेवारी या र्मयादीत कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली ही सेवा पुढे सुल राहणार की नाही याबाबत अद्याप कुठलीच घोषणा करण्यात आलेली नाही.