शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
4
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
5
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
6
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
7
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
8
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
10
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
11
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
12
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
13
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
14
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
15
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
16
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
17
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
18
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
19
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
20
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

पावसाने मूग, उडीद पिकाला तारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:55 IST

अकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर जिल्हय़ात पावसाला सुरुवात झाली आहे; या हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे. माना टाकलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी व इतर खरीप पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे. जिल्हय़ात गेल्या चोवीस तासांत १५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; पण हा पाऊस सार्वत्रिक दमदार नसल्याने  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम   आहे. जिल्ह्यातील धरणातील जलसाठयातही घट सुरू  आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, कापूस, ज्वारीला पोषकदमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर जिल्हय़ात पावसाला सुरुवात झाली आहे; या हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे. माना टाकलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी व इतर खरीप पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे. जिल्हय़ात गेल्या चोवीस तासांत १५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; पण हा पाऊस सार्वत्रिक दमदार नसल्याने  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम   आहे. जिल्ह्यातील धरणातील जलसाठयातही घट सुरू  आहे.शुक्रवारपासून पावसाला सुरुवात झाली असली, तरी या पावसाचे सार्वत्रिक स्वरू प नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. हा पाऊस तालुकानिहाय होत असल्याने पावसाची टक्केवारी वाढलेली दिसत आहे. असे असले, तरी या पावसाने माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. मूग, उडीद या अल्पकालीन पिकांना हा पाऊस प्रचंड पोषक ठरला आहे. ही दोन पिके ऐन सणासुदीच्या पूर्वी परिपक्क होत असल्याने शेतकर्‍यांच्या हातात दिवाळी, दसर्‍याच्या अगोदर पैसा येतो. ही पिके काही ठिकाणी फुलोर्‍यावर, शेंगावर आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात ज्यांनी पेरणी केली, तेथे मुगाच्या शेंगा वाळल्या आहेत.  काही ठिकाणा काढणीही सुरू  झाली आहे; परंतु यावर्षी उशिरा पेरणी झाल्याने बहुतांश मूग, उडिदाचे पीक हिरवे आहे. दरम्यान, गेल्या १५ ते २0 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात १९ ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला, तर अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

पावसाची स्थितीशनिवारी पातूर तालुक्यात मंडळनिहाय सरासरी १0५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये पातूर मंडळात १९ मि.मी., बाभूळगाव २२ मि.मी., सस्ती २0 मि.मी., आलेगाव २६ मि.मी. आणि चान्नी मंडळात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. बाळापूर तालुक्यात १३४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये बाळापूर मंडळात ३५ मि.मी., वाडेगाव १७ मि.मी., पारस २६ मि.मी., उरळ १४ मि.मी., हातरूण ११ मि.मी., निंबा २१ मि.मी., व्याळा १0 मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी १९.१४ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना लाभ होणार आहे, तर इतर पिकांसाठी पोषक ठरणार आहे. जिल्ह्यातील इतर भागात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. -