शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

रस्त्यांवर चिखल;‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:16 IST

अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदल्या जात आहे. अनेक प्रभागांमध्ये चक्क रस्ते खोदण्यात आल्याचे चित्र आहे.

अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदल्या जात आहे. अनेक प्रभागांमध्ये चक्क रस्ते खोदण्यात आल्याचे चित्र आहे. मंगळवारी शहराच्या काही भागात आलेल्या पावसामुळे खोदलेल्या मातीचा चिखल रस्त्यांवर पसरल्यामुळे अनेक वाहनधारक घसरून पडल्यामुळे किरकोळ जखमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्यावरची माती हटवून त्यावर ताबडतोब रोलर फिरविण्याचे निर्देश वजा सूचना महापौर विजय अग्रवाल यांच्यासह प्रशासनाने ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला दिले होते. कंपनीने या सर्व सूचनांना पायदळी तुडविण्याचे काम सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. शहरात पहिल्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाने ११० कोटी मंजूर केले. त्यापैकी ८७ कोटींची निविदा प्रकाशित करण्यात आली होती. जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा कंत्राट ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला मिळाला. आज रोजी शहरात ४१८ किलोमीटरपैकी ९७ किलोमीटर अंतराचे जलवाहिनीचे जाळे टाकताना कंत्राटदाराकडून मुख्य रस्त्यालगत व प्रभागात चक्क रस्ते खोदून जलवाहिनी टाकली जात आहे. खोदकाम केलेल्या मुख्य रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही, हे येथे विशेष. त्याचे परिणाम अकोलेकरांना भोगावे लागत आहेत. सोमवारी व मंगळवारी शहराच्या काही भागात झालेल्या पावसामुळे मुख्य रस्ते चिखलमय झाल्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.आयुक्तांच्या आदेशाला ‘खो’!रस्त्याचे खोदकाम करून जलवाहिनी टाकल्यानंतर सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला मध्यंतरी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी खडेबोल सुनावले होते. रस्त्यांची दुरुस्ती केल्यानंतरच पुढील कामाला मंजुरी देणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्यानंतरही कंपनीने मनमानी कारभार सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे. करारातील अटी व शर्तींचा सोयीनुसार फायदा उचलत कंपनीने सुरू केलेल्या कारभारासमोर तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची यंत्रणा हतबल ठरत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका