शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

महावितरणने केला विक्रमी २२,३३० मेगावॉट वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 17:07 IST

MSEDCL supplies a record 22,330 MW मंगळवारी (९ मार्च) तब्बल २२ हजार ३३९ मेगावॉट विजेची आजवरची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली.

अकोला: मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी (९ मार्च) तब्बल २२ हजार ३३९ मेगावॉट विजेची आजवरची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. या मागणीप्रमाणे चोख नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने उच्चांकी वीजपुरवठ्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापर देखील वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरु आहे. मात्र मंगळवारी राज्यात मुंबईसह तब्बल २५ हजार २०३ मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८० लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २२ हजार ३३९ मेगावॉट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला. राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही, हे उल्लेखनीय.

उन्हाळ्यामुळे येत्या एप्रिल व मे महिन्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. त्याप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून तयारी सुरु आहे.

 

२१,५७० मेगावॉटचा विक्रम मोडला

महावितरणने १९ फेब्रुवारी २०२० रोजी उच्चांकी मागणीप्रमाणे आतापर्यंत २१हजार ५७० मेगावॉट विजेचा विक्रमी पुरवठा केला होता. मंगळवारी हा विक्रम मोडीत निघाला.

अशी झाली वीज उपलब्ध

महावितरणला दीर्घकालीन करार असलेल्या महानिर्मितीकडून ७७६१ मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून ४२१६ मेगावॉट, अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्को आदींकडून ४२०२ मेगावॉट वीज उपलब्ध झाली. सोबतच सौर ऊर्जेद्वारे १९७४ मेगावॉटसह नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतून ३१६२ मेगावॉट वीज उपलब्ध झाली. तसेच कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १७४० मेगावॉट तर पॉवर एक्सचेंजमधील खरेदीसह मुक्त ग्राहक वीज निर्मिती स्त्रोताद्वारे १२५८ मेगावॉट वीज उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण