शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गो-ग्रीन : राज्यातील लाखावर वीजग्राहक झाले पर्यावरणस्रेही

By atul.jaiswal | Updated: March 17, 2020 13:20 IST

यामध्ये अकोला परिमंडळातील सुमारे चार हजार वीजग्राहकांचा समावेश आहे

अकोला : वीज देयकासाठी कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ते ‘ई-मेल’द्वारे देण्याच्या महावितरणच्या 'गो-ग्रीन' या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत राज्यातील एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये अकोला परिमंडळातील सुमारे चार हजार वीजग्राहकांचा समावेश आहेमहावितरणकडून 'गो-ग्रीन' योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल'चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रति बिल १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजबिल 'ई-मेल' तसेच 'एसएमएस'द्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह आॅनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. तसेच वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर वीजबिल मूळ स्वरुपात उपलब्ध असून ते डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याची सोय आहे.महावितरणमध्ये आतापर्यंत १ लाख ३ हजार ९१८ वीजग्राहकांनी 'गो-ग्रीन' योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील् ा४००६९ ग्राहकांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर कोकण प्रादेशिक - ३७८००, नागपूर प्रादेशिक विभाग - १३७१७ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील १२३३२ वीजग्राहकांचा समावेश आहे. 'गो-ग्रीन'चा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळा वर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.परिमंडळनिहाय गोषवारापरिमंडळ                     पर्यावरणस्रेही ग्राहकअकोला -                           ३९३९अमरावती -                         २९२७पुणे -                                 २४९७५बारामती -                          ८३३०कोल्हापूर -                        ६७६४नागपूर -                           ४२४९गोंदीया-                            १२८८चंद्रपूर -                            १४१४नाशिक -                          १०५८३कोकण-                            २१६१कल्याण-                         १०१३२जळगाव -                        ५३९४भांडूप -                             ९५३०औरंगाबाद -                      ५३१०लातूर-                                 ४०३५नांदेड -                                  २९८७

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोला