शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

 अकोल्यातील महाविद्यालयांमध्ये महावितरणने मोबाईल अ‍ॅप, आॅनलाईन व विविध सेवेसंदर्भात केली जनजागृती

By atul.jaiswal | Published: November 03, 2017 5:24 PM

महावितरणने आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत  ग्राहकांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सेवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अकोला परिमंडळाच्यावतीने अधिकाºयांनी थेट संवाद साधीत अकोला येथील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून जागृती केली .

ठळक मुद्दे विविध महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा. विद्यार्थी व उपस्थितांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

अकोला : ग्राहकांना तत्पर व घरबसल्या चांगली सेवा मिळावी म्हणून महावितरणने आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत  ग्राहकांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सेवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अकोला परिमंडळाच्यावतीने अधिकाºयांनी थेट संवाद साधीत अकोला येथील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून जागृती केली .      अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांच्या संकल्पनेनुसार महावितरणच्या विविध सेवांची माहिती थेट ग्राहकांना व्हावी म्हणून महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. यामध्ये अकोला येथील श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय, सीताबाई कला महाविद्यालय, व रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय येथे कार्यशाळा घेण्यात येऊन विद्यार्थी व प्राध्यापक वृन्द यांना  महावितरणच्या विविध सेवांची माहिती देण्यात आली. यामध्ये मोबाईल अ‍ॅॅप, आॅनलाइन वीज भरणा, मोबाईल क्रमांक नोंदणी व त्याचे फायदे, ग्राहकसेवा केंद्र, कॉल सेंटर, विज बचत व विद्युत सुरक्षा, कनेक्शन आॅन कॉल अशा विविध सुविधा सेवांची माहितीचा समावेश होता. सोबतच यावेळी विद्यार्थी व उपस्थितांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीप्रभू चापके यांनी उपक्रमाचे कौतुक करीत महावितरणच्या आॅनलाइन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  या संवाद कार्यक्रमात अकोला परिमंडलाचे  वरिष्ठ व्यवस्थापक राहुल पन्हाळे, प्रणाली विश्लेषक सचिन राठोड, उपविधी अधिकारी सुनिल उपाध्ये, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्य अभियंता राजेश अहिर, उपव्यवस्थापक गुरमितसिंह गोसल, गणेश भंडारी, सहाय्यक अनुदेशक अभिजीत मते यांनी संवाद साधीत विविध विषयांची माहिती दिली.  सदर उपक्रमाकरीता महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्य व प्राध्यापक वृन्द यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण