शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा प्रभारी कार्यकारी अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 16:29 IST

अकोला : वाणिज्यीक विज जोडणी देण्यासाठी एका उप कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करणाºया महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास लाचलूचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार, १३ आॅक्टोबर रोजी सापळा रचून रंगेहात अटक केली. गत १८ सप्टेंबर रोजी एका कंत्राटदारास वर्कआॅर्डर देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी ...

ठळक मुद्देदहा हजाराची घेतली लाच महिनाभरात महावितरणला बसला दुसरा ‘शॉक’

अकोला : वाणिज्यीक विज जोडणी देण्यासाठी एका उप कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करणाºया महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास लाचलूचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार, १३ आॅक्टोबर रोजी सापळा रचून रंगेहात अटक केली. गत १८ सप्टेंबर रोजी एका कंत्राटदारास वर्कआॅर्डर देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर याला अटक करण्यात आली होती. उंबरकरच्या जागी कार्यकारी अभियंता पदाची जबाबदारी घेतल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत जानोकार हा देखील ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला.अकोला येथील एका ४२ वर्षीय उप कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून ‘एसीबी’ने शुक्रवारी हा सापळा रचला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन शालीग्राम जानोकार (५५) याने २४ दिवसापूर्वीच ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार स्विकारला होता. या काळात एका आईस्क्रिम पार्लरसाठी नवीन विद्युत जोडणी देण्यासाठी मंजूरी देण्याकरीता तसेत मागील सात दिवसांत बाळापूर, बार्शीटाकळी उपविभागातील शेतकºयांच्या कृषीपंपासाठी वीज जोडणीकरीता लागणारे करारपत्र देऊन काम करण्याची परवानगी देण्याकरीता प्रभारी कार्यकारी अभियंता जानोकार याने १० हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केल्याची तक्रार सदर उप कंत्राटदाराने ‘एसीबी’कडे केली होती. एसीबीने शुक्रवार, १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता कार्यालयात शुक्रवारी दुपारी १.१५ मिनीटांनी सापळा रचण्यात आला. यावेळी जानोकार याने कंत्राटदाराकडून रक्कम स्विकारताच ‘एसीबी’च्या अधिकाºयांनी झडप घालून जानोकारला ताब्यात घेतले. जानोकारकडून लाचेपोटी स्वीकारलेली १० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याला अटक करण्यात आली. एसीबीचे पोलीस उपअधिक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.२४ दिवसांत अडकला दुसरा अधिकारीमहावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर याला १८ सप्टेंबर रोजी एका कंत्राटदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर उंबरकर याला २२ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले. त्यानंतर मुळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन जानोकार याला त्याच दिवशी अकोला ग्रामीण विभागाचा प्रभार सोपविण्यात आला होता. पदभार स्विकारल्याच्या २१ व्या दिवशी गजानन जानोकार हा देखील लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकला.